
नवनीत तापडिया
Aurangabad : औरंगाबाद येथे अंधश्रद्धेतून एका इसमास जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुप्तधन मिळवण्यासाठी ३ जणांनी मिळून पीडित व्यक्तीला विवस्त्र केले. तसेच ज्वलनशील पदार्थ त्यांच्या अंगावर टाकून त्यांचा बळी देण्याचा प्रयत्न केला. या धक्कादायक घटनेत १ महिना उलटून गेल्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली आहे. ( Aurangabad Crime News)
मिळालेल्या माहितीनुसार, गुप्तधन काढण्यासाठी एका इसमाचा नरबळी देण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना ९ डिसेंबर रोजी समोर आली होती. ३ जणांनी पीडित व्यक्तीला दारू पाजून विवस्त्र करत, त्यांच्या अंगावर कोंबडे ओवाळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. फुलंब्री तालुक्यातील बनकीन्होळा येथे ही घटना घडली आहे.
या घटनेत पीडित व्यक्ती यांच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकले असल्याने त्यांचा एक पाय कापावा लागला. तर त्यांच्यावर अजूनही घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी काल अखेर वडोद बाजार पोलीस ठाण्यात नरबळी आणि खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी यातील आरोपींना अटक केलेली असली तरी पुरोगामी महाराष्ट्रात आजही असे प्रकार समोर येत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
औरंगाबादमध्ये गुन्हेगारीच्या अनेक घटना समोर येत आहेत. उद्योगनगरी वाळूज औद्योगिक परिसरातील बंद पडलेल्या एका कंपनीत धडावेगळे शिर असलेले मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. या मृतदेहाची ओळख पटवून या प्रकरणी पुण्यातील दोन आरोपींना एमआयडीसी वाळूज पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
अजय असे मृताचे नाव आहे तर निखील गरड आणि प्रतिक शिंदे अशी आरोपींची नावे आहेत. या तिघांमध्ये दारू पिऊन झालेल्या किरकोळ वादातून आरोपी निखिल आणि प्रतिक यांनी बंद पडलेल्या कंपनीत नेऊन अजयचे धडा वेगळे शीर करून त्याचा खून केला. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिसांनी (Police) दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलंय.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.