जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची हजेरी आता फेस रीडिंगद्वारे

जिल्हा परिषद कर्मचाऱ्याची हजेरी आता फेस रीडिंगद्वारे
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची हजेरी आता फेस रीडिंगद्वारे
जिल्हा परिषद

राजेश भोस्तेकर

रायगड : शासकीय कर्मचारी कार्यालयात आल्यानंतर पूर्वी हजेरीबुकवर सही करावी लागत असे. त्यानंतर थंब यंत्रणा आली. मात्र यामुळे अनेकवेळा कर्मचारी वेळेत कार्यालयात हजर राहतो की नाही हे कळत नव्‍हते. परंतु आता बायोमेट्रिक फेस रीडिंग यंत्रणा कार्यालयात कार्यान्वित केली आहे. त्यामुळे कर्मचारी याच्या चेहऱ्याची ओळख झाल्यानंतर हजेरी लागली जात आहे. (Attendance-of-Raigad-Zilla-Parishad-staff-now-through-face-reading)

जिल्हा परिषद
भावजायीला पाटावर बसवत नणंदांनी ओवाळले; माहेरी आल्‍यावर अनोखी भाऊबीज

रायगड जिल्हा परिषदेने ही बायोमेट्रिक फेस रीडिंग यंत्रणा कार्यान्‍वीत केली आहे. रायगड जिल्हा परिषद कार्यालयात साधारण चारशे अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत. जिल्ह्याची ग्रामीण विकास यंत्रणा ही या कार्यालयातून राबवली जाते. कार्यालयात कर्मचारी, अधिकारी हे वेळेत हजर व्हावेत आणि नागरिकांच्या समस्या त्वरित सुटाव्यात यासाठी बायोमेट्रिक फेस रीडिंग हजेरी यंत्रणा कार्यन्वित केली आहे. यासाठी बायोमेट्रिक यंत्रणेत अधिकारी, कर्मचारी याची माहिती टाकण्यात आली आहे.

पंचायत समितीतही बसवली जाणार यंत्रणा

बायोमेट्रिक फेस रीडिंग यंत्रणा कार्यान्‍वीत केल्‍यामुळे आता अधिकारी, कर्मचारी हे कार्यालयात वेळेवर आणि स्वतः हजर असल्याचे समजणार आहे. त्यामुळे कार्यालयातील कामकाजही लवकर होण्यास मदत होणार आहे. जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या पंचायत समितीमध्येही ही यंत्रणा बसवली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

चेहऱ्याची ओळख झाली की हजेरी

बायोमेट्रिक मशीनसमोर कर्मचारी उभा राहिल्यानंतर त्वरित त्याच्या चेहऱ्याची ओळख झाली की हजेरी लागली जाते. त्यामुळे वेळेचीही बचत होत असून कार्यालयात तोच अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहिल्याचेही कळते. त्यामुळे जिल्हा परिषद कार्यालयात बसविण्यात आलेल्या यंत्रणेने आता कर्मचारी वेळेत हजर राहण्यास मदत होणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com