कांदा ठेवलाय का विकला? बघा कसला भारी भाव मिळतोय!
OnionSaam tv

कांदा ठेवलाय का विकला? बघा कसला भारी भाव मिळतोय!

अहमदनगर ः गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे भाव पडले होते. जेमतेम दराने विकला जाणाऱ्या कांद्याने उचल खाल्ली आहे. अतिवृष्टीने शेतातील कांदा सडला आहे. भाव मिळतो की नाही या विवंचनेत शेतकऱ्यांनी मिळेत त्या भावात कांदा विकून टाकला. चाळीतील कांद्याचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे बाजारात आवक कमी आहे. आगामी काही काळात भाव चढे राहणार असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात आज सोमवारी झालेल्या लिलावात विजयकुमार बोरुडे, बालेश्वर ट्रेडिंग कंपनी, महाविष्णू ट्रेडिंग कंपनी यांच्या आडतींवर गावरान कांद्याला क्विंटलला ५ हजार २०० रूपयांचा भाव मिळाला. Auction of Rs. 5,000 per quintal of onion in Ahmednagar market abn79

Onion
महसूलमंत्र्यांचा कारखाना देणार मोफत १५ किलो साखर!

दिलीप ठोकळ यांच्याही आडतीवर १० गोण्यांना ५ हजार २०० रूपयांचा भाव मिळाला असल्याची माहिती बाजार समितीचे उपस्भापती संतोष म्हस्के यांनी दिली.

गेल्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे नाशिक कांद्याचे फारच नुकासान झाले आहे. शेतकरी बांधवांनी गावरान उन्हाळी कांदा चाळीत जपून ठेवला असल्याने गावरान कांद्याला चांगला भाव मिळत आहे, असे निरीक्षण सभापती अभिलाष घिगे यांनी नोंदवले. आज बाजारात २४ हजार ५६४ क्विंटल कांद्याची आवक झाली. तर ६ हजार ५७४ गोणी कांद्याची आवक झाली.

आजचे गावरान कांद्याला सोमवारी मिळालेले बाजारभाव प्रतिक्विंटल ः१ नंबर= ३ हजार ६०० ते ४ हजार ५००, २ नंबर=२ हजार ८०० ते ३ हजार ६००, ३ नंबर= एक हजार ५०० ते दोन हजार ८००, ४ नंबर=७०० ते दीड हजार. Auction of Rs. 5,000 per quintal of onion in Ahmednagar market abn79

लाल कांदा बाजार भाव ः १ नंबर= एक हजार १०० ते दीड हजार, २ नंबर= ६०० ते एक हजार १००, ३ नंबर-३०० ते ६००, ४ नंबर=१०० ते ३०० रूपये.

Related Stories

No stories found.