'या' दोघांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपदी निवड; सेनेच्या बंडखोर आमदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल

'तुमच्या भूमिकेचं तालुक्याने स्वागत केलं आहे, ऑफिसवर सगळ्या तालुक्यात चर्चा आहे की आमदारांनी चांगला निर्णय घेतला, असं कार्यकर्ता म्हणत आहे. '
'या' दोघांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपदी निवड; सेनेच्या बंडखोर आमदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल
Eknath ShindeSaam TV

पंढरपूर : विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निवड होणार आहे. दोघेही माझे जवळचे आहेत. मला मंत्रीपद मिळाले नाही तर चालेल मात्र, मतदार संघातील कामे झाली म्हणजे झालं असं शिवसेनेचे सांगोल्याचे बंडखोर आमदार शहाजी पाटील (MLA Shahaji Patil) यांनी म्हटले आहे.

आमदार शहाजी पाटील आणि एका कार्यकर्त्यांची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियात (Social Media) चांगलीच व्हायरल झाली आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या विरोधात बंडाचे निशाण ‌फडकावले आहे. या बंडामध्ये सांगोल्याचे शहाजी पाटील सहभागी झाले आहेत.

एकीकडे शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्याया बंडखोरीला भाजपचं पाठबळ आहे हे एक उघड गुपित असलं तरी याबाबत भाजप समोर येत नाहीये. तर शिवसेनेच्या बंडखोर आमदारांकडून आपणाला भाजपचं पाठबळ असल्याचं बोललं जात आहे. अशातच शिंदे यांनी देखील आपणाला राष्ट्रीय पक्षाचे पाठबळ असल्याचं म्हंटलं आहे.अशातचं आता या व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये या बंडखोर आमदारांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा भाजप आणि शिंदे यांच्यामध्ये काही आधीच ठरंल आहे का? अशा चर्चांना उधाण आलं आहे.

हे देखील पाहा -

अशातच आमदार शहाडी पाटील यांच्यासोबत एका कार्यकर्ता फोनवर बोलत असताना पाटील म्हणत आहेत, 'निवडणूकीमुळे माझं घरदार बरबाद झालं आहे. राजकारणाचा मला कंटाळा आला आहे. नको असं वाटत होतं. पण मला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मला भावा सारखे आहेत. फडणवीस आणि एकनाथ शिंदे असल्यामुळे आपली कामं होतील. मला मंत्रीपदाची अपेक्षा नाही. मतदार संघातील कामे होतील असं आमदार पाटील यांनी म्हटले आहे. आमदार पाटील यांच्यातील संवादाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियात सध्या चांगलीच व्हायरल झाली आहे.

Eknath Shinde
कोणाला घाबरवताय, तुमच्या असल्या धमक्यांना भीक घालत नाही - एकनाथ शिंदे

दरम्यान, या ऑडिओ क्लिपमध्ये शहाजी पाटील यांचा कार्यकर्त्याला आपला तालुका कसा आहे असा प्रश्न विचारत आहेत तेव्हा, तुमच्या भूमिकेचं तालुक्याने स्वागत केलं आहे. ऑफिसवर सगळ्या तालुक्यात चर्चा आहे की आमदारांनी चांगला निर्णय घेतला आहे असं कार्यकर्ता म्हणत आहे. तर आपणाला या गटामध्ये खूप रिस्पेक्ट देत आहेत, मात्र, आधीच्या सरकारमध्ये कोणी विचारत देखील नव्हत असं देखील आमदार म्हणत असून त्यांनी या क्लिपमध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच तोंडभरुन कौतुक केलं आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com