Vinayak Mete : साहेबानं लक्ष दिलं नाही ! त्याच दिवशी चालू गाडीतून मी मेसेज केला हाेता; मेटेंच्या मृत्यूनंतर ऑडिओ क्लिप व्हायरल

विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूनंतर कार्यकर्त्यांचा झालेला संवाद व्हायरल हाेऊ लागला आहे.
vinayak mete, audio clip viral,
vinayak mete, audio clip viral, saam tv

Vinayak Mete : शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक विनायक मेटे (Vinayak Mete) यांचे नुकतेच अपघाती निधनं झाले. मेटे यांच्या अपघातानंतर अनेक प्रश्नांना कांगाेरे फुटले आहेत. मेटे समर्थक तसेच त्यांचे नातेवाईक हा अपघात नसून घातपात असल्याचा दावा करीत आहेत. प्रशासकीय स्तरावर या घटनेची चाैकशी सुरु झाली आहे. दरम्यान सध्या बीड जिल्ह्यात मेटे यांच्या कार्यकर्त्यांचा संवाद व्हायरल होत आहे. यापुर्वी देखील तीन ऑगस्टला एक घटना घडल्याचं संवादातून लक्षात येत आहे.

अण्णासाहेब मायकर आणि मेटे यांच्या कार्यकर्त्यांचा संवादात अण्णासाहेब म्हणतात तीन ऑगस्टला मी साहेबांसाेबत हाेता. त्यांच्याबराेबर मुंबईला चाललाे हाेताे. त्यावेळी शिक्रापूरपासून दोन किलोमीटर अंतरापर्यंत दोन वाहनं आमचा पाठलाग करत हाेती. यामध्ये ट्रक होता. शिक्रापूरपासून आमचा पाठलाग सुरु हाेताे अस मायकर म्हणत आहेत.

vinayak mete, audio clip viral,
Nagpur University Exam : नागपूर विद्यापीठानं रद्द केल्या परीक्षा; जाणून घ्या कारण

संबंधित वाहन कधी मागे तर कधी पुढं जात होती. एक ट्रक देखील हाेता त्यामुळं आम्हांला पुढं जाता येत नव्हते असे मायकर सांगताहेत. मी साहेबांना देखील म्हटलं काेण हाय बघु या का. तेव्हा साहेब म्हणाले असू दे काेण तरी असेल. त्यावेळी त्यांनी जाऊ दया पुढं त्यांना असं ही सांगितलं. दरम्यान साहेबच सगळं बघत हाेते. त्यामुळं त्यावेळी आम्हीही शांत राहिलाे असं मायकर यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

vinayak mete, audio clip viral,
Pandharpur Crime News : लैंगिक अत्याचार प्रकरण; युवकाची तुरुंगात आत्महत्या

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com