ACP Vishal Dhume : मोठी बातमी! महिलेची छेड काढणाऱ्या औरंगाबादच्या एसीपी विशाल ढुमेंवर निलंबनाची कारवाई

मद्यधुंद अवस्थेत केलं गैरकृत्य
ACP Vishal Dhume
ACP Vishal DhumeSaam Tv

Aurangabad News : महिलेच्या छेडछाड आणि विनयभंग प्रकरणी एसीपी विशाल ढुमे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. गृह विभागाकडून ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. विशाल ढुमे यांच्यावर एका महिलेची छेड काढल्याप्रकरणी रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

ACP Vishal Dhume
Nagpur News : भयंकर! हेडफोन लावून रेल्वेरुळ ओलांडणं बेलतं जीवावर; ट्रेनच्या धडकेत तरुणीचा जागीच मृत्यू

पोलीस दलातील एका मोठ्या अधिकाऱ्यानेच दारुच्या नशेत महिलेचा विनयभंग केल्याने शहरात एकच खळबळ उडाली. महिलेचा विनयभंग आणि महिलेच्या नातेवाईकांना मारहाण करणारे औरंगाबाद (Aurangabad) शहरातील एसीपी विशाल ढुमे त्या रात्री किती मद्यधुंद होते, याचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर (Social Media) सध्या व्हायरल होत होता.

एका मित्राला घरी सोडण्याची विनंती करून, गाडीत बसल्यावर त्याच्या पत्नीचा ढुमे यांनी विनयभंग केला होता. एवढचं नाही तर पीडीत महिलेच्या पतीला बेदम मारहाण देखील केली होती. त्यानंतर पीडित महिलेच्या तक्रारीवरुन या प्रकरणी औरंगाबादच्या सीटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

ACP Vishal Dhume
Urfi Javed: तोकड्या कपड्यांमधील उर्फीचा 'पुणे स्टाइल'नं निषेध; म्हणाले, तरूण मुलांच्या...

तर न्यायालयात हजर केले असता त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र अवघ्या चार तासात त्यांना जामीन मिळाला होता. मात्र त्यांच्यावर गृहविभागाकडून कोणतेही कारवाई होत नसल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात होता. त्यामुळे वाढता संताप पाहता अखेर गृहविभागाकडून विशाल ढुमे यांत्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com