पैसे दे अन्यथा अश्लील Video व्हायरल करु; धमक्यांना घाबरुन प्रेमी युगुलाची आत्महत्या

याप्रकरणी एका महिलेसह दोघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पैसे दे अन्यथा अश्लील Video व्हायरल करु; धमक्यांना घाबरुन प्रेमी युगुलाची आत्महत्या
पैसे दे अन्यथा अश्लील Video वायरल करु; धमक्यांना घाबरुन प्रेमी युगुलाची आत्महत्याSaam Tv

औरंगाबाद - दोघांच्या प्रेम संबंधाचे व्हिडिओ आमच्याकडे आहेत. तू आम्हाला पैसे दे नाही तर आम्ही तुमची बदनामी करू, अशी धमकी दिल्याने प्रेमी युगुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना औरंगाबाद जिल्ह्यतल्या गंगापूर तालुक्यातील मालुंजा येथे घडली आहे. याप्रकरणी एका महिलेसह दोघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील पहा -

२८ वर्षीय उमेश साळुंके आणि १८ वर्षीय तबसुम शेख अशी मृतांची नावे आहेत. याप्रकरणी मयत उमेशच्या वडिलांनी गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. गावातील कृष्णा रावसाहेब पवार यांनी तुमचे अश्लिल व्हिडिओ आमच्याकडे आहेत, तू आम्हाला पैसे दे नाही तर तुझे व्हिडीओ आम्ही व्हायरल करू असे म्हणून मृत उमेश याला दमदाटी करुन धमकी देत होते. हा प्रकार माझ्या मुलाने माझ्या कानावर टाकल्यावर मी गावातील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब पवार, भाऊ मच्छिंद्र साळुंके यांना घेऊन धमकी देणाऱ्याच्या घरी जाऊन उमेशला त्रास देऊ नको आणि उमेशची विनाकारण बदनामी करु नका असे सांगितले होते. तरीही तो ऐकत नसल्याने माझ्या मुलाने आत्महत्या केल्याचे तक्रारीत लिहिले आहे.

पैसे दे अन्यथा अश्लील Video वायरल करु; धमक्यांना घाबरुन प्रेमी युगुलाची आत्महत्या
दिल्ली सरकार संपूर्ण लॉकडाऊनच्या तयारीत?

कृष्णा रावसाहेब पवारच्या धमक्या आणि त्रासाला कंटाळूनच माझा मुलगा उमेश याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी साळुंके यांनी केली. याप्रकरणी मालुंजा येथील एका जणाविरूद्ध गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. मृताचे वडील संतराम साळुंके यांच्या फिर्यादीवरून कृष्णा रावसाहेब पवार याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com