Aurangabad Crime News : उसने पैसे देऊन महिलेवर दोन वर्षे अत्याचार; औरंगाबादेतील धक्कादायक घटना

पैशाच्या कारणावरून आरोपी हा नेहमी पीडितेच्या घरी येत जात होता.
Aurangabad Crime News
Aurangabad Crime News Saam TV

Aurangabad Crime News : औरंगाबाद (Aurangabad) शहरातील वाळूज परिसरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली. पतीपासून विभक्त राहत असलेल्या महिलेवर एकाने दोन वर्ष अत्याचार केला. पीडित महिला पतीपासून विभक्त राहत असल्याचा फायदा घेत आरोपीने महिलेला 50 हजार रुपये उसने दिले. त्यानंतर सतत दोन वर्ष तिच्यावर अत्याचार केला. (Aurangabad News Today)

Aurangabad Crime News
Ahmadnagar News : आईनेच पोटच्या मुलीला परपुरूषाशी संबंध ठेवण्यास भाग पाडलं; काळिमा फासणारी घटना

याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात एमआयडीसी पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा (Crime News) दाखल करण्यात आला आहे. तनवीर तसलीम शेख असे आरोपीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, 29 वर्षीय पीडित महिला पतीपासून विभक्त राहते. वाळूज एमआयडीसी येथील एका खाजगी कंपनीत काम करून ती आपला उदरनिर्वाह चालवते.

ऑक्टोबर 2020 मध्ये पीडित महिलेची ओळख तनवीर शेख सोबत झाली होती. त्यावेळी पैशाची चणचण भासत असल्याने पीडितेने आरोपीकडून 50 हजार रूपये उसने घेतले. आरोपीकडून 50 हजार रुपये उसने घेतले. पैशाच्या कारणावरून आरोपी हा नेहमी पीडितेच्या घरी येत जात होता. (Aurangabad Latest Marathi News)

Aurangabad Crime News
Beed: लज्जास्पद! नात्याला काळिमा, जन्मदात्या बापानेच केला 12 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार

दरम्यान, आरोपीने पीडितेच्या एकटेपणाचा फायदा घेत जबरदस्तीने शारिरीक संबंध प्रस्थापित केले. तुला दिलेले उसने पैसे तू मला परत देऊ नको तू माझ्यासोबत राहा. असं म्हणत आरोपीने तब्बल २ वर्ष पीडितेचे लैंगिक शोषण केले.

याबाबत कुणाला सांगितल्यास आरोपीने पीडितेला जीवे मारण्याची धमकीही दिली. आरोपीचे कृत्य दिवसेंदिवस वाढत असल्याने पीडितेने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. दरम्यान, पीडितेच्या तक्रारीवरून वाळूज पोलिसांनी आरोपी तनवीरविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com