औरंगाबाद हादरलं! झोपलेल्या पतीला फरपटत नेत पत्नीसमोरच चिरला गळा

Aurangabad Crime : कैलास हा मूळ मध्यप्रदेश राज्यातील असून काही महिन्यांपूर्वी तो रोजगारासाठी पत्नी मुलांसह औरंगाबादेतील करोडी शिवारात आला होता.
औरंगाबाद हादरलं! झोपलेल्या पतीला फरपटत नेत पत्नीसमोरच चिरला गळा
Aurangabad CrimeSaam Tv

औरंगाबाद: मराठवाड्याची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत. अशातच पत्नीसह घरात झोपलेल्या 27 वर्षीय मजुराला अज्ञात आरोपीने फरपटत बाहेर नेले आणि धारदार शस्त्राने गळ्यावर तीन ते चार वार करीत निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक औरंगाबादमधील दौलताबाद पोलीस स्टेशनच्या (Daulatabad Police Station) हद्दीत घडली आहे. घटनेनंतर आरोपी पसार झाला. हत्येचे कारण अद्यापही स्पष्ट झालं नाही. (Aurangabad (Daulatabad Crime News)

Aurangabad Crime
गर्लफ्रेंडला फिरवण्यासाठी चोरायचा बाईक; पोलिसांनी सापळा रचून केली अटक

कैलास बीआनसिंग मिंगवाल (वय २७) असे हत्या झालेल्या मजुरांचे नाव आहे. पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दौलताबाद पोलीस ठाणे हद्दीतील करोडी शिवारात शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास घडली. कैलास हा मूळ मध्यप्रदेश राज्यातील असून काही महिन्यांपूर्वी तो रोजगारासाठी पत्नी मुलांसह औरंगाबादेतील करोडी शिवारात आला होता. तेथे तो गट क्रमांक-१११ मध्ये शेतात कामाला होता. शेताजवळच असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये तो पत्नीसह वास्तव्यास होता. शुक्रवारी नियमितपणे कैलासने पत्नीसोबत जेवण केले त्यानंतर दोघेही झोपी गेले.

दरम्यान मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास अज्ञात मारेकऱ्याने झोपलेल्या अवस्थेतच कैलास ला फरपटत बाहेर नेले. त्यानंतर धारदार शस्त्राने कैलासच्या गळ्यावर तीन ते चार वार करून पसार झाला. पतीवर हल्ला झाल्याने कैलासच्या पत्नीने आरडाओरड केली. आवाज ऐकून शेजाऱ्यांनी कैलासच्या घराकडे धाव घेतली मात्र, तोपर्यंत मारेकरी अंधाराचा फायदा घेत पसार झाला होता. घटनेची माहिती मिळताच दौलताबाद पोलिसांनी घटनस्थळी धाव घेत जखमी कैलासला रुग्णालयात हलविले मात्र तो प्रयन्त कैलासची प्राणज्योत मालवली होती.

कैलासच्या पत्नीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अनोळखी होता. त्याने कैलासला का मारले हे स्पष्ट होऊ शकले नाही. या प्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कैलास हा मध्यप्रदेश येथील मजूर होता. रात्री एका अज्ञात आरोपीने त्याची हत्या केली आहे. मारेकरी कोण आहे.मारण्याचा उद्देश काय? जुने काही वैर होते का? याचा तपास सुरू आहे असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनीता मिसाळ यांनी दिली आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.