'तूच माझ्याशी लग्न कर, अन्यथा...'; मेहुणीला ब्लॅकमेल करत व्हिडिओ कॉल, स्क्रीन शॉट केले व्हायरल

औरंगाबादमधून नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे.
Auarangabad crime news
Auarangabad crime news saam tv

नवनीत तापडिया

Aurangabad crime news : औरंगाबादमधून नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एकाने मेहुणीला ब्लॅकमेल करून नग्न व्हिडिओ कॉल करण्यास भाग पाडून त्याचे स्क्रीन शॉट व्हायरल केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांना आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. (Latest Marathi News)

Auarangabad crime news
Crime News : मार्केट यार्डात गाेळीबार; २८ लाखांची लूट, पाेलिस तपास सुरु

मिळालेल्या माहितीनुसार, मेहुणीला ब्लॅकमेल करून नग्न व्हिडिओ कॉल करण्यास भाग पाडून त्याचे स्क्रीन शॉट व्हायरल केल्याची घटना औरंगाबादमध्ये (Aurangabad) घडली आहे. या प्रकरणी २१ वर्षीय पीडितेच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपीला १४ नोव्हेंबर पर्यंत पोलीस (Police) कोठडीत आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

Auarangabad crime news
CCTV Footage : सोलापुरात डॉक्टरची मुजोरी, वयोवृद्ध व्यक्तीला फायबर रॉडने बेदम मारहाण

नेमकं काय घडलं ?

पीडितेच्या लग्नाआधी दोन वर्षांपू्र्वी सुट्यांमध्ये आरोपीचा नऊ वर्षांचा मुलगा पीडितेच्या घरी आलेला होता. तेव्हा त्याच्याशी संपर्क साधण्यासाठी आरोपीने अॅन्ड्रॉईड मोबाइल दिला होता. त्या मोबाईलवरूनच आरोपी पीडितेशी बोलायचा. त्यांच्यात बोलणे सुरू असतानाच आरोपीने 'तुझ्या बहिणीला शारीरिक समस्या आहेत. तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवता येत नाहीत. आता तूच माझ्याशी लग्न कर, अन्यथा मी फाशी घेईन. मग तुझ्या बहिणीची मुले उघड्यावर येतील,' असे बोलून तिला भावनिक केले.

अश्लील फोटोंचा आणि व्हिडीओ कॉलच्या स्क्रीन शॉटचा एक व्हिडीओबाबत पीडितेला माहिती मिळाल्यावर ती काही दिवस शांत राहिली. दरम्यान, 16 सप्टेंबर रोजी आरोपीने पुन्हा त्याचा मित्र आणि पीडितेच्या आतेभावाला व्हिडीओ पाठविले. त्यामुळे अखेर पिडीत महिलेने याप्रकरणात सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला 14 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com