Aurangabad: नोकरी मिळवून देण्याच्या आमिषाने अनेकांना गंडा; एकाला अटक

आरोपी महिलेने महापालिकेचे आयुक्त, अग्निशमन विभागाचे प्रमुख यांच्या सहीचे बनावट कागदपत्र तयार करून अनेकांची फसवणूक केली असल्याचं समोर आलं आहे. या मास्टरमाईंड महिलेकडे विविध अधिकाऱ्यांचे बनावट शिक्के, बनावट कागदपत्रे आढळून आले आहेत.
Aurangabad: नोकरी मिळवून देण्याच्या आमिषाने अनेकांना गंडा; एकाला अटक
Aurangabad Municipal CorporationSaam Tv

औरंगाबाद - महापालिकेतील अग्निशमन दलात नोकरी (Job)मिळवून देतो म्हणून अधिकाऱ्यांच्या बनावट सहीचे कागदपत्रे तयार करून अनेकांना गंडा घालणाऱ्या एका महिलेला सिटी चौक पोलिसांनी (Police) अटक (Arrest) केली आहे. या महिलेने महापालिकेचे आयुक्त, अग्निशमन विभागाचे प्रमुख यांच्या सहीचे बनावट कागदपत्र तयार करून अनेकांची फसवणूक केली असल्याचं समोर आलं आहे. या मास्टरमाईंड महिलेकडे विविध अधिकाऱ्यांचे बनावट शिक्के, बनावट कागदपत्रे आढळून आले आहेत. सोनाली ज्ञानेश्वर काळे-नामेकर असे या महिलेचे नाव असून ती पैठण (paithan) तालुक्यातील पानरांजणगाव इथली रहिवासी आहे. (Aurangabad Fraud Latest News)

हे देखील पहा -

महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे प्रमुख राजू सुरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात महापालिकेचे आयुक्त आस्तिक कुमार पांडेय आणि अग्निशमन विभागाचे मुंबईतील संचालक के. आर. हत्याल यांच्या बनावट सह्या, शिक्क्यांचा वापर करीत मुख्य आरोपीने नियुक्तीपत्र दिले होते.

Aurangabad Municipal Corporation
Byculla Fire: भायखळा परिसरात लाकडी गोदामाला भीषण आग

गुन्हा दाखल झाल्यापासून मुख्य आरोपी सोनाली काळे- नामेकर ही फरार होती. औरंगाबाद शहर पोलिसांनी त्या महिलेचे मोबाइल लोकेशन ट्रेस करून तिला अटक केली आहे. यामध्ये जवळपास १०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना बनावट नोकरीची ऑर्डर देऊन फसवणूक (Fraud) केल्याची शक्यता आहे, असा पोलिसांना अंदाज आहे आता त्याचा शोध सुरू आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com