हिमाचलमधून सफरचंद औरंगाबादेत विकायला आणले; चोरट्यांनी डल्ला मारून मुंबईत विकले

आतापर्यंत आपण सोने-चांदी, वाहन चोरल्याच्या अनेक घटना ऐकल्या असतील. परंतु औरंगाबाद (Aurangabad) शहरातील एका चोरट्याने हिमाचल प्रदेशातून शहरात विकायला आणलेल्या व्यापाराचे सफरचंद चोरले
aurangabad Crime News
aurangabad Crime Newssaam tv

नवनीत तापडिया

औरंगाबाद : आतापर्यंत आपण सोने-चांदी, वाहन चोरल्याच्या अनेक घटना ऐकल्या असतील. परंतु औरंगाबाद (Aurangabad) शहरातील एका चोरट्याने हिमाचल प्रदेशातून शहरात विकायला आणलेल्या व्यापाराचे सफरचंद चोरले. त्यानंतर सफरचंद हे पुणे मार्गे नेऊन मुंबईला विकलेल्या सफरचंद चोराला पोलीसांनी अटक केली आहे. (Aurangabad Crime News )

aurangabad Crime News
धक्कादायक! जन्मदात्या बापानेच लहान पोरांना दारू पाजली, व्हिडीओ व्हायरल

औरंगाबाद येथील क्रांती चौक पोलिसांनी शहरातून सफरचंद चोरून मुंबईत विकलेल्या सफरचंद चोरट्याला (Theif) अटक करून बेड्या ठोकल्या आहेत तसेच त्याच्याकडून चोरी केलेल्या सफरचंदाचा मुद्देमाल वसूल करण्यात आला आहे. सफरचंद चोरीची चर्चा औरंगाबाद शहरात सुरू झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी निसार अहेमद ऊर्फ सलमान गफार पठाण या आरोपीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सफरचंद विक्रेता रिहान बागवान याने एका वाहनामध्ये प्रत्येकी २० किलो सफरचंदाचे १०० बॉक्स भरून क्रांती चौक परिसरातील मूनलाईट हॉटेल समोर ठेवले. दुसऱ्या दिवशी तो हे सफरचंद जालन्याला घेऊन जाणार होता. मात्र, सफरचंदाची चोरी झाल्याचे कळाले. त्यानंतर पोलीसात त्यानं सफरचंदाचे ३० बॉक्स चोरी गेल्याची तक्रार दाखल केली.

aurangabad Crime News
बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर; शाळकरी मुलांना करावा लागतोय जीवघेणा प्रवास

त्यानंतर क्रांती चौक पोलिसांनी संशयित निसार अहमद उर्फ सलमान गफार पठाण याचा फोटो ट्रॅव्हल्सवाल्यांना दाखवल्यानंतर त्यानेच सफरचंद चोरून ट्रॅव्हल्सद्वारे पुणे मार्गे मुंबईला नेल्याचे उघडकीस आले. यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली. त्याच्याकडून ३० हजार रुपये व सफरचंद विकत घेतलेल्या मुंबईतील विक्रेत्याकडून ३० हजार असे एकूण ६० हजार रुपये रोख पोलीसांनी मिळविले आहेत. या आरोपीने यापूर्वी देखील जवाहर नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दुकान फोडून टायर चोरी केल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com