Cyber Crime: महिला IPS अधिकाऱ्याच्या नावाने बनावट ट्विटर अकाऊंट; अनेकांना मागितले पैसे

महिला IPS अधिकाऱ्याच्या नावाने ट्विटर अकाऊंट; अनेकांना मागितले पैसे
Cyber Crime
Cyber CrimeSaam tv

नवनीत तापडीया

छत्रपती संभाजीनगर : पोलिस अधीक्षक तथा आयपीएस अधिकारी मोक्षदा पाटील यांच्या नावाने ट्विटरवर बनावट खाते उघडले होते. त्या (Aurangabad) खात्यावरून एका बालकाला वैद्यकीय मदतीसाठी पैशांचे आवाहन केले. मात्र हे खाते बनावट असल्‍याचे लक्षात आल्‍यानंतर सायबर पोलिसांच्‍या (Cyber Police) कारवाईनंतर ते बंद केले. (Maharashtra News)

Cyber Crime
Jalna News: सासरवाडीत येऊन जवायाकडून सासऱ्यावर गोळीबार; सासऱ्याचा जागीच मृत्‍यू

लोहमार्ग पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या नावाने व्टिटरवर बनावट अकाऊंट उघडले होते. एका बाळाचे लिव्हर ट्रान्सप्लांट करायचे असून त्याच्या उपचारासाठी पैसे पाठवा; असे लिहून त्यासोबत बाळाचा उपचाराचा फोटो आणि आर्थिक मदत पाठविण्यासाठी (Cyber Crime) फोन पेचा क्यूआर कोडही दिला.

Cyber Crime
Eknath Khadse: महाजनांना खडसे नावाचा कावीळ झालाय; आमदार एकनाथ खडसे भडकले

अनेकांनी पाठविले पैसे

अधिकारीचे आवाहन असल्‍याने क्‍यूआर कोडवर अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पैसे पाठविले होते. काहींनी पैसे पाठविल्यानंतर पाटील यांना हे समजले. त्यांनी शहर, ग्रामीण आणि रेल्वे सायबर पोलिसांना बनावट खात्याची माहिती दिली. सायबर पोलिसांच्या तातडीच्या कार्यवाहीनंतर सोमवारी मध्यरात्री बनावट खाते बंद करण्यात आले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com