औरंगाबादेत खड्ड्याने घेतला दोन तरुणांचा जीव

औरंगाबाद जिल्ह्यातील (Aurangabad District) सिल्लोडजवळ एका खड्ड्यांने दोन तरुणांचा जीव घेतला आहे.
औरंगाबादेत खड्ड्याने घेतला दोन तरुणांचा जीव
औरंगाबादेत खड्ड्याने घेतला दोन तरुणांचा जीवSaam Tv

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यातील (Aurangabad District) सिल्लोडजवळ एका खड्ड्यांने दोन तरुणांचा जीव घेतला आहे. सिल्लोड-औरंगाबाद रस्त्यावर (Sillod Aurangabad Road) सिल्लोड शहरातून बाहेर पडल्यानंतर हाकेच्या अंतरावर रस्त्याचे खोदकाम करून ठेवले आहे. खड्ड्यांमुळे याठिकाणी अनेक छोटेमोठे अपघात होत आहेत. सोमवारी मात्र खड्ड्याने तरूणांचा जीव घेतला. त्या खड्ड्यांमध्ये मुरूम टाकल्याने पावसाच्या पाण्याने चिखल झाला होता.

सोमवारी संध्याकाळी नऊ वाजेच्या सुमारास सिल्लोड येथून दुचाकी क्रमांक दोघे जण पिंपळगावपेठ येथे जात होते. खड्ड्याच्या ठिकाणी समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिल्यामुळे दुचाकीचा चुराडा होऊन दुचाकीवरील १९ वर्षीय कार्तिक संजय लोणकर आणि २१ वर्षीय धनंजय अशोक बेलवार यांचा जागीच मृत्यू झाला.

दोघेही पिंपळगाव पेठ येथील रहिवासी होते. त्यांनंतर आज दोघांच्या नातेवाईकांनी ठेकेदार आणि संबंधित विभागावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आक्रमक झाले आहेत. दरम्यान सपूर्ण राज्याचा विचार केला तर पावसामुळे रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. नुकत्याच बनवलेल्या रस्त्यांवर मोठ मोठे खड्डे दिसून येत आहेत. तेच खड्डे लोकांच्या जिवावर बेतत आहेत.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com