
नवनीत तापडिया
औरंगाबाद : औरंगाबाद (Aurangabad) शहरातील फाईन आर्ट्सचे शिक्षण घेणाऱ्या दोन मैत्रिणींनी टाकाऊ प्लास्टिक (Plastic) आणि बिसलेरी बॉटलचा वापर करून एक आगळे वेगळे प्लास्टिक वावर तयार केले आहे. कल्याणी भारंबे आणि नमिता कपाळे अशी या मैत्रिणींची नावे आहेत. सध्या हे प्लास्टिक वावर लोकांचे आकर्षण ठरत आहे. त्यांच्या प्लास्टिक वावराची संपूर्ण औरंगबादमध्ये चर्चा सुरू झाली आहे. ( Aurangabad News In Marathi )
मागील काही दिवसांपासून राज्यात आणि देशात गुवाहाटी हा चर्चेचा विषय ठरत आहे. याच गुवाहाटीतील एका शाळेचा यु-ट्यूबवर व्हिडीओ बघून औरंगाबाद शहरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात फाईन आर्ट्सचे शिक्षण घेणाऱ्या दोन मैत्रिणींनी टाकाऊ प्लास्टिक आणि बिसलेरी बॉटलचा वापर करत एक आगळे वेगळे प्लास्टिक वावर तयार केले आहे. गेल्या एप्रिल महिन्यापासून हे काम त्यांनी सुरू केले आणि आता ते पूर्णत्वास गेले आहे.
शहरातील रस्त्यांवर पडलेले टाकाऊ प्लास्टिक आणि कचराकुंडीवर पडलेल्या बिसलरी बॉटल या तरुणींनी जमा करून या बॉटल्समध्ये टाकाऊ प्लास्टिक भरुन त्यांनी त्या एकावर एक विटा सारख्या ठेवून त्याच्या भिंती तयार करून अनोखे घर बनवले आहे. यासाठी त्यांनी तब्बल 16 हजाराहून अधिक बिसलरी बॉटल्सचा उपयोग केला.
तसेच यासाठी त्यांना सुमारे सहा ते सात लाख रुपये खर्च देखील आला. हे सर्व त्यांनी लॉकडाऊनच्या काळामध्ये याची सुरुवात केली होती. यावेळी त्यांना घरच्यांकडून सुरुवातीला फारसा पाठिंबा मिळाला नाही. मात्र त्यांनी आपल्या घरच्यांना या सर्व गोष्टी पटवून दिल्यानंतर त्यांच्या परिवाराने देखील त्यांना सहकार्य केले आणि सर्वांच्या मदतीने त्यांनी अनोखे प्लास्टिक वावर तयार केले आहे, असे प्लास्टिक वावर तयार करणाऱ्या या विद्यार्थिनींने सांगितले.
दरम्यान, हे आगळे वेगळे प्लास्टिक वावर तयार झाल्यानंतर दोन्ही मैत्रिणींनी आपले प्लास्टिकचे गाव बनवण्याचे स्वप्न पूर्ण झाल्याचे सांगितले. औरंगाबाद शहरापासून जवळच असलेले हे प्लास्टिकचे वावर या परिसरात येजा करणाऱ्या नागरिकांचे आकर्षण ठरत आहे. यामुळे कचराकुंडीतील टाकाऊ वस्तू पासूनही आपण अशा अनेक आकर्षित आणि अनोख्या वस्तू बनवू शकतो हे त्यांनी यातून दाखवून दिले आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.