
Aurangabad News : औरंगाबादच्या शेतकऱ्याच्या दोन मुलांनी रोजंदारीची नोकरी सोडून चक्क बँक उभारलीय. मनात एखादी गोष्ट मिळवण्याची प्रबळ इच्छा असेल तर ती गोष्ट प्रतिकूल परिस्थितीत देखील साध्य करता येते हे त्या दोन तरुणांनी दाखवून दिलंय.
औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील मुरमा गावातील शेतकऱ्यांची हे मुले. आता ते बँकेचे मालक झालेत. मनोज मापारी आणि गणेश मापारी अशी त्यांची नाव आहेत. प्रतिकूल परिस्थितीमुळे शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागले.
त्यानंतर कुटुंबाची जबाबदारी असल्यानं रोजंदारीवर एकाने बँकेत पिग्मी एजंट म्हणून काम केले तर तर दुसऱ्याने सेतू सुविधा केंद्रात काम केले. पण मन काही रमेना.अखेर मुरमा या खेड्यात राहणाऱ्या या युवकांनी दैनंदिन रोजंदारीची नोकरी सोडून बँकेची स्थापना केली. स्वतःसह या चार वर्षात बारा जणांना हक्काची नोकरी मिळवून दिली.
पैठण तालुक्यातील मुरमा येथील मनोज मापारी व गणेश मापारी हे दोघेही शेतकरी पुत्र. दोघांच्या घरी करोडवाहू शेती, आई-वडिलांचे कुटुंबीय शेतीत राबायचे. शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून खर्चही भागत नसल्याने दोघांनाही दहावीनंतर शिक्षण सोडावे लागले.
गणेश मापरी यांनी पाचोड एका बँकेत (Bank) पिग्मी एजंट तर मनोज मापरे यांनी एका सेतू सुविधा केंद्रात रोजंदारी नोकरी सुरू केली. त्यावर घर चालवणे अशक्य झाले. त्यांनी शेतीवर बँक कर्ज काढून कर्ज घेऊन पाचोड येथे शिवमुद्रा अर्बन नावाने बँक सुरू करण्याची मुंबई येथे बैंकिंग वित्त विभागाकडे नोंदणी केली. या विभागाकडे या तरूणांनी सांगितले आहे.
मे २०१८ एक इमारत भाड्याने घेऊन बँक सुरू केली. शून्यापासून सुरुवात झालेल्या या बँकेत मनोज मापारी व मुख्याधिकारी तर गणेश मापारी अध्यक्ष म्हणून काम काज सांभाळू लागले. सुरुवातीला खाते उघडण्यासाठी कोणी धाजवत नव्हते.
मात्र, आज त्यांच्याकडे चार हजापेक्षा अधिक खातेदार आहेत. दोन वर्षात शेकडो कोटीची उलाढाल झाली असून त्यांनी आता पुन्हा चितेगाव येथे शाखा सुरू केली आहे. छोट्या-मोठ्या उद्योगात उभारणीसाठी तीनशे पेक्षा अधिकांना एक ते दीड कोटी रुपये कर्ज वाटप केल्याने त्यांनी स्वयंरोजगार उपस्थित झाला.
एकेकाळी स्वतः रोजंदारी धडपडणारे या युवकांनी बँकेचे माध्यमातून इतरांना रोजगाराच्या वाटा शोधल्या. बँक सुरू करायची म्हणली तर हजर होऊन जातील पण या अल्पशिक्षित आणि गरीब घरच्या शेतकऱ्यांच्या मुलांनी ते करून दाखवलेय.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.