दारूची आठवण येताच वडिलांचा मृतदेह सोडुन मुलगा पसार

दारुड्या मुलाला दारूची आठवण येताच तो आपल्या वडिलांच्या मृतदेहाला सोडुन डेथसर्टिफिकेट सोबत घेऊन निघून गेला.
दारूची आठवण येताच वडिलांचा मृतदेह सोडुन मुलगा पसार
दारूची आठवण येताच वडिलांचा मृतदेह सोडुन मुलगा पसार अविनाश कानडजे

अविनाश कानडजे

औरंगाबाद - दारूसाठी काही पण, दारू समोर स्वतःचे वडीलदेखील काहीच नाही असाच काहीसा प्रकार औरंगाबाद मधील घाटी रुग्णालयात समोर आला आहे. एका दारुड्या मुलाला दारूची आठवण येताच तो आपल्या वडिलांच्या मृतदेहाला सोडुन डेथसर्टिफिकेट सोबत घेऊन निघून गेला. डेथसर्टिफिकेट नसल्यामुळे नातेवाईकांना मृतदेह मिळत नव्हता, त्यामुळे त्यांची चांगलीच धावपळ झाली. काल सायंकाळी हा प्रकार घाटी रुग्णालयात घडला.

हे देखील पहा -

मृताच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळासाहेब धोंडीराम सोनवणे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सोनवणे यांना फुफुसाचे आजार असल्याने त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांना शवविच्छेदन गृहात हलवण्यात आले. दरम्यान मुलगा आपल्या वडिलांचे डेथसर्टिफिकेट घेऊन दारू पिण्यासाठी निघून गेला.

दारूची आठवण येताच वडिलांचा मृतदेह सोडुन मुलगा पसार
"...तर मला 13 आमदार निवडुन द्या" - नारायण राणे

बराच वेळ कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला फोन केला. मात्र, तो मिळून आला नाही. डेथसर्टिफिकेट दिल्याशिवाय डॉक्टरांनी मृतदेह ताब्यात देण्यास नकार दिला. त्यामुळे अखेर त्याच्या बहिणीला त्याला शोधण्यासाठी बाहेर पडावं लागलं. रुग्णालयात असलेल्या नागरिकांनी देखील त्याची शोधाशोध सुरू केली, मात्र सर्वजण अपेशी ठरले. त्यानंतर काही वेळाने हा दारुडा मुलगाच घाटी रुग्णालयात हजर झाला आणि गोंधळ थांबला.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.