औरंगाबाद महाविद्यालयीन तरुणी हत्या प्रकरण; आरोपीला 27 मेपर्यंत पोलीस कोठडी

आरोपीने तरुणीवर धारदार शस्त्राने 14 ते 15 वार केले. हत्येनंतर तो फरार झाला
Aurangabad Murder
Aurangabad MurderSaam TV

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये (Aurangabad) एकतर्फी प्रेमातून महाविद्यालयीन तरुणीचा धारदार शस्त्राने हत्या करणाऱ्या आरोपी शरणसिंग सविंदरसिंग सेठीला (Sharan Singh Savinder Singh Shetty) पोलिसांनी रविवारी दुपारी नाशिक जिल्ह्यातील लासलगाव (Lasalgaon) येथून अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 27 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीने एकतर्फी प्रेमातून तरुणीला 200 मीटर फरफटत नेलं. त्यानंतर तिची धारदार शस्त्राने हत्या केली. (Aurangabad Latest Crime News)

Aurangabad Murder
दोन दुचाकींची समोरासमोर धडक; 3 जण जागीच ठार, दोघे गंभीर

हत्या केल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. एका ट्रकमधून त्याने नाशिक जिल्ह्यातील लासलगावपर्यंत प्रवास केला. तेथे आरोपी शरणसिंग याची बहीण राहत असून तिच्याकडे पोहोचताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. याप्रकरणात सुखप्रीत कौरचा भाऊ हरप्रीतसिंग प्रितपाल सिंग ग्रंथी (वय २४) यांनी वेदान्तनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

नेमकी घटना काय?

औरंगाबाद शहरातील देवगिरी महाविद्यालयात डिग्रीच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या ग्रंथी सुखप्रीत कौर या 19 वर्षीय तरुणीचा शनिवारी खून झाला होता. आपल्याला बोलत नाही म्हणून आरोपी शरणशिंग याने तरुणीला 200 मीटर फरफटत नेऊन तिची हत्या केली. आरोपीने तरुणीवर धारदार शस्त्राने 14 ते 15 वार केले. हत्येनंतर तो फरार झाला. रक्ताच्या थारोळय़ात पडलेल्या तिच्या मैत्रीणीने सुखप्रीतचा भाऊ हरप्रीतसिंग यांना फोन करून बोलावले होते. त्यानंतर सुखप्रीतला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला.

या थरारक घटनेनंतर संपूर्ण औरंगाबाद शहरात मोठी खळबळ उडाली होती. हत्या करून फरार झालेल्या आरोपी शरणशिंग याला अटक करण्याचे पोलिसांपुढे आव्हान होते. दरम्यान, शरणशिंग हा लालसगाव येथे आपल्या बहिणीकडे गेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचत शरणशिंग याच्या मुसक्या आवळल्या. त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने शरणशिंगला 27 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com