Aurangabad Gram Panchayat Elections| पैठणमधील ७ पैकी ६ ग्रामपंचायतींवर शिंदे गटाची सत्ता

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्येही शिंदे गटाचे वर्चस्व दिसत आहे.
Aurangabad Gram Panchayat Elections Eknath Shinde News Update
Aurangabad Gram Panchayat Elections Eknath Shinde News UpdateSAAM TV

नवनीत तापडिया

Aurangabad Gram Panchayat Elections Results 2022 : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्येही शिंदे गटाचे वर्चस्व वाढत आहे. औरंगाबादमध्येही ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटाने आपली ताकद दाखवून दिली आहे. पैठण तालुक्यातील ७ पैकी ६ ग्रामपंचायतींवर शिंदे गटाने विजयाचा झेंडा फडकावला आहे.

Aurangabad Gram Panchayat Elections Eknath Shinde News Update
Pandharpur Grampanchayat Results | पंढरपूरच्या टाकळी ग्रामपंचायतीवर CM एकनाथ शिंदे गटाची सत्ता

पैठण तालुक्यातील ७ पैकी ६ ग्रामपंचायतींवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाने सत्ता मिळवली आहे. शिंदे गटाचे आमदार संदीपान भुमरे यांच्या पॅनलने या ग्रामपंचायत निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे.

अपेगाव, खेर्डा, नानेगाव, शेवता, अगरनांदर, गावंतांडा या ग्रामपंचायती (Gram Panchayat Elections Results)आता शिंदे गटाच्या ताब्यात आल्या आहेत. या निवडणुकीत या पॅनलने विजय मिळवला आहे. त्यामुळे पैठण तालुक्यात शिंदे गटाला हे मोठे यश मिळाल्याचे मानले जात आहे.

Aurangabad Gram Panchayat Elections Eknath Shinde News Update
Gram Panchayat Election 2022: उद्धव ठाकरे गटाचा भाजपला पहिला धक्का; साेलापुरात ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ता

दुसरीकडे औरंगाबादमधील (Aurangabad) सिल्लोड तालुक्यातही शिंदे गटाचे वर्चस्व दिसून आले आहे. येथील ग्रामपंचायतींमध्ये शिंदे गटाची जादू दिसून आली आहे. शिंदे यांचे समर्थक आमदार अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली लढवलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत वर्चस्व निर्माण केले आहे. तीन ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालात सत्तार यांच्या समर्थकांनी बाजी मारली आहे. उपळी, जंजाळा, नानेगाव या तिन्ही ग्रामपंचायतींवर सत्ता मिळवली आहे.

शिंदे गटाने साताऱ्यातील पहिली ग्रामपंचायत जिंकली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने शंभुराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत निवडणूक लढवली होती. कराड तालुक्यातील पाटण विधानसभा मतदारसंघातील उत्तर तांबवे ग्रामपंचायतीत २२ वर्षानंतर सत्तांतर झाले.

उत्तर तांबवे ग्रामपंचायत निवडणुकीत सातपैकी चार जागा जिंकून शंभुराज देसाई यांचे पॅनेल विजयी झाले आहे. कार्यकर्त्यांनी शंभुराज देसाई यांच्या नावाच्या घोषणा देत जल्लोष केला.

बीडमध्ये शिंदे गटाचे वर्चस्व

बीड जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत शिंदे गटाचे वर्चस्व असल्याचे सिद्ध झाले आहे. बीड तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींपैकी दोन ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटाने विजय मिळवला.

Edited By - Nandkumar Joshi

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com