दुहेरी हत्याकांडाने औरंगाबाद हादरलं; पुंडलीकनगरात पती-पत्नीची हत्या

Aurangabad Husbend Wife Murder : औरंगाबाद शहरातील पुंडलीकनगर परिसरातून ही घटना उघडकीस आली आहे
Aurangabad Husbend Wife Murder
Aurangabad Husbend Wife MurderSaam TV

Aurangabad Husbend Wife Murder : मराठवाड्याची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यात (Aurangabad Crime) दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढतंच चाललं आहे. शनिवारी औरंगाबाद शहरात एकतर्फी प्रेमातून एका तरुणीची हत्या झाली होती. ही घटना ताजी असतानाच आता एका पती-पत्नीची (Husbend Wife Murder) हत्या झाली असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शामसुंदर हिरालाल कलंत्री (वय ५५) आणि किरण शामसुंदर कलंत्री (वय ४५ वर्षे) अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत. दोघांचेही मृतदेह आपल्या राहत्या घरी कुचलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. (Aurangabad Husbend Wife Murder Crime News)

Aurangabad Husbend Wife Murder
अनैतिक संबंधास अडसर ठरत होता पती; पत्नीने गाठला क्रूरतेचा कळस

मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद शहरातील पुंडलीकनगर परिसरात ही घटना घडली आहे. शामसुंदर हिरालाल कलंत्री आणि किरण शामसुंदर कलंत्री यांचे मृतदेह आपल्या राहत्या घरी कुजलेल्या अवस्थेत आढळून आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहे.

दोघांचेही मृतदेह इमारतीच्या वेगवेगळ्या मजल्यावर पलंगाखाली लपवून ठेवलेले आढळून आले. त्यामुळे दोघांचीही हत्या झाली असावी असा संशय पोलिसांना आहे. दरम्यान, पोलिसांनी दोनही मृतदेह आपल्या ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. कलंत्री यांची हत्या त्यांच्या मुलानेच केली असावी असाही संशय पोलिसांना आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com