Aurangabad: गौताळा घाटात दरड कोसळली, वाहतूक ठप्प

सिल्लोड व कन्नडकडे जाणारी-येणारी वाहने या गौताळा घाटात दरड कोसळल्याने बंद केली आहेत.
Aurangabad: गौताळा घाटात दरड कोसळली, वाहतूक ठप्प
Aurangabad: गौताळा घाटात दरड कोसळली, वाहतूक ठप्प Saam Tv

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद : गौताळा घाटात (Gautala Ghat) नागद ते कन्नड मार्गावर (Kannad Road) म्हसोबा हुडीजवळ पहिल्याच वळणावर दरड कोसळली आहे. या ठिकाणी पहिल्या हुडीपासून ते दुसऱ्या वळणापर्यंत धोकादायक रस्ता झाला आहे. यामुळे अनेक ठिकाणी मोठी दगडे वर अडकली आहेत. तसेच अनेक दरडी कोसळण्याची (landslide) शक्यता आहे. तर वनविभागाच्या कक्ष क्रमांक 548, 549 जवळ दरड कोसळली आहे, असे वनविभागाच्या अधिकऱ्यांनी सांगितले आहे.

हे देखील पहा -

मागील आठवड्यात औट्रम घाटात अनेक ठिकाणी दरड कोसळली होती. त्यामध्ये अनेक छोटी-मोठी वाहने अडकून पडली होती. तसेच अनेक वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. यामध्ये जीवितहानी देखील झाली होती. तसेच शेकडो वाहने व वाहनधारक या घाटामध्ये उपाशीपोटी राहिले होते. त्या ठिकाणी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी तातडीने भेट देऊन अडकून पडलेल्या वाहनधारकाची जेवणाची पाण्याची सोय करून तसेच अडकलेली वाहन रस्ता मोकळा करून वाहने पास करून घेतली होती. मात्र तेव्हापासून हा घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

Aurangabad: गौताळा घाटात दरड कोसळली, वाहतूक ठप्प
Sharad Pawar: यापुढे गर्दी जमणारे कार्यक्रम स्विकारणार नाही

आता दरड कोसळलेल्या गौताळा घाटातील रस्त्यावरून इंदौर, सुरत, नंदुरबार, धुळे, मालेगावकडे वाहने जातात. सिल्लोड व कन्नडकडे जाणारी-येणारी वाहने या गौताळा घाटात दरड कोसळल्याने बंद केली आहेत. या घाटातून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहे.

Edited By- Anuradha

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com