एकादशीच्या दिवशीच मरण यावं म्हणून वृद्ध महिलेनं उचललं टोकाचं पाऊल

ही घटना औरंगाबाद शहरातील शिवाजीनगर परिसरात रविवारी रात्री उशिरा घडली.
Aurangabad News
Aurangabad NewsSaam Tv

औरंगाबाद: आध्यात्माची गोडी असलेल्या वृद्धीने आजाराला कंटाळून एकादशीच्या दिवशी अंगाला गावरान तूप लावून पेटवून घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना औरंगाबाद (Aurangabad) शहरातील शिवाजीनगर परिसरात रविवारी रात्री उशिरा घडली. कावेरी भास्कर भोसले (वय - ८०) असे या वृद्धेचे नाव आहे.

Aurangabad News
मतदान ओळखपत्रही आधारशी लिंक करावे लागणार; १ ऑगस्टपासून सुरू होणार मोहिम

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी एकादशीच्या दिवशी दिवसभर भजन, हरिपाठ केल्यानंतर रात्री झोपायला गेल्यानंतर आपल्या रुममध्ये त्यांनी अंगाला गावरान तूप लावून देवाचे नाव घेत स्वत:ला पेटवून घेतले. त्यांना त्यांच्या मुलाने व सुनेने घाटी येथील रुग्णालयात (Hospital) दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मावळली. या प्रकरणी पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Aurangabad News
शिवसेना पक्ष आम्ही वाढवला तो आमचाच; ठाकरेंच्या मुलाखतीनंतर शिंदे गटातील आमदाराच वक्तव्य

पोलिसांकडून (Police) मिळालेल्या माहितीनुसार, कावेरी भोसले यांना आध्यात्माची प्रचंड आवड होती. तसेच एकादशीला मृत्यू यावा, अशी त्यांची भावना होती. याबाबत त्यांनी अनेकदा कुटुंबातील सदस्यांना बोलून दाखवली होती. दरम्यान, रविवारी कामिका एकादशी होती. त्यामुळे कावेरी भोसले यांनी रात्री १० वाजेच्या सुमारास हरिपाठ म्हटला.

कुटुंबातील सदस्य झोपण्यासाठी गेले असता, त्या स्वतः वरच्या मजल्यावर गेल्या. वरच्या मजल्यावर गेल्यावर कावेरी यांनी बाथरूममध्ये जाऊन आधी सुती कापड हाताला गुंडाळले. त्यावर गावरान तूप ओतले. काही तूप अंगालाही लावले. त्यांनतर काडी ओढून त्यांनी स्वतः पेटवून घेतले. तूप टाकलेले असल्याने कापडाने लगेचच पेट घेतला. ज्यात कावेरी भोसले यांचा मृत्यू झाला. यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना चांगलाच धक्का बसला आहे

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com