Aurangabad News : सावधान! औरंगाबाद जिल्ह्यातही गोवरची एन्ट्री, दोन बालकांचा अहवाल पॉझिटिव्ह

रंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातही गोवरची गोवरची एन्ट्री झाली आहे
Aurangabad Measles Disease
Aurangabad Measles DiseaseSaam Tv

Aurangabad News : राज्यात गोवरने धुमाकूळ घालण्यास सुरूवात केली आहे. मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यात गोवरचे रुग्ण आढळून येत आहेत. एकीकडे गोवरचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न केले जात असताना आता दुसरीकडे औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातही गोवरची गोवरची एन्ट्री झाली आहे. जिल्ह्यात गोवरचे दोन रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.  (Latest Marathi News)

Aurangabad Measles Disease
हृदयद्रावक! खेळता खेळता बाळाने तोंडात टाकला मासा; श्वास अडकल्याने तडफडून मृत्यू

मुंबई, भिवंडी, मालेगावपाठोपाठ औरंगाबाद जिल्ह्यातही गोवरने प्रवेश केला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात दोन बालकांना गोवरची लागण झाली आहे. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये शहरातील एका ७ वर्षीय बालकाचा, आणि सिल्लोड येथील ४ वर्षे ११ महिन्यांचा बालिकेचा समावेश आहे. अजूनही आठ रुग्णांचा अहवाल प्रतीक्षेत आहे.

औरंगाबादेत गेल्या काही दिवसांपासून महापालिकेच्या आरोग्य विभागासह सार्वजनिक आरोग्य विभागाकडून विविध खबरदारी घेण्यास सुरुवात करण्यात आली. औरंगाबाद शहरातील नाहिदनगर येथील ७ वर्षीय मुलाला गोवरची लागण झाली आहे. या मुलाला १० नोव्हेंबर रोजी अंगावर पुरळची लक्षणे आढळली होती. सिल्लोड येथील बालिकेला १३ नोव्हेंबर रोजी लक्षणे आढळली होती.

आरोग्य विभाग अलर्टवर

आतापर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात फक्त गोवर संशयित रुग्ण आढळून येत होते. मात्र, आता दोन बालकांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे.

औरंगाबाद महापालिकेच्या आणि ग्रामीण भागातील आरोग्य विभागाकडून घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जात आहे. तसेच संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले जात आहे. तसेच नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहनन देखील आरोग्य विभागाकडून करण्यात आलं आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com