मुंबईच्या वरासह वऱ्हाड्यांची धुलाई; लग्न मोडलं, वधूचं दुसरं लग्नही लागलं! पाहा नेमकं काय घडलं?

Aurangabad marriage Drama News : एखाद्या चित्रपटाची पटकथा वाटावी असा हा फॅमिली ड्रामा आणि फ्रीस्टाईल हाणामारी याची चर्चा सध्या सगळीकडे होतेय.
मुंबईच्या वरासह वऱ्हाड्यांची धुलाई; लग्न मोडलं, वधूचं दुसरं लग्नही लागलं! पाहा नेमकं काय घडलं?
Aurangabad marriage Dramaलक्ष्मण सोळुंके

औरंगाबाद: लग्न म्हटलं की, लग्नात (marriage) वर पक्षाची बाजू वर आणि वधू पक्षाची बाजू नमती असं आपल्याकडे एक अलिखीत समीकरण आहे. लग्नात वर पक्षाचा मान-सन्मान हा सातव्या आकाशात असतो. वराच्या किंवा वर पक्षातील वऱ्हाड्यांच्या मानपानात जरा काही कमी-जास्त झालं की, वर पक्ष हा वधूच्या नातेवाईकांना धारेवर धरत असल्याचं अनेकदा होत असतं. अशीच एक घटना औरंगाबादेत (Aurangabad) घडली आहे. मुंबईचा (Mumbai) वर वरात (वऱ्हाड) घेऊन औरंगाबादला आला. मात्र, वधू पक्षाकडून मानपानात दोष काढत मुंबईच्या वऱ्हाड्यांनी वाद घातला. यानंतर वधूच्या चिडलेल्या नातेवाईकांनी मुंबईहून आलेल्या वऱ्हाड्यांना चोप दिला. पोलीस आले, लग्न मोडलं आणि लागलीच वधूचं दुसरं लग्न लागलं... एखाद्या चित्रपटाची पटकथा वाटावी असा हा फॅमिली ड्रामा आणि फ्रीस्टाईल हाणामारी याची चर्चा सध्या सगळीकडे होतेय. (Aurangabad marriage Drama action mumbai guest beaten by bride relatives see filmy story of jalna)

हे देखील पाहा -

मिळालेल्या माहितीनुसार, विवाहासाठी आलेल्या मुंबईच्या वऱ्हाडाने मानपानावरून वधू पक्षाशी वाद घातला. तणावात हे लग्न ही लावले. मात्र लग्नानंतर वधू पसंत नसल्याचं कारण सांगत नवरीला सोबत करण्यास वराने नकार दिला. यानंतर चिडलेल्या नातेवाईकांनी मुबंईवरून आलेल्या वऱ्हाडी मंडळीची चांगलीच धुलाई करत त्यांच्या वाहनांची तोडफोड केली. ही घटना औरंगाबाद शहरातील बीड बायपास परिसरातील गांधेली परिसरात घडली आहे. मारहाण झाल्यानंतर वधूला घेऊन न जाता फुटलेली वाहन घेऊन हे वऱ्हाड मुबईला निघून गेले. मात्र वधूच्या नातेवाईकांनीही याला न जुमानता रात्री उशिरा नात्यातील मुलासोबतच या वधूचा विवाह लावून दिला.

तणावात लग्न लागलं

सविस्तर घटना अशी की, जालना (Jalna) जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातल्या तरुणीचा विवाह मुंबईत राहणाऱ्या तरुणासोबत ठरला होता. वधूचे मामा आणि बहिण औरंगाबाद शहरातील गांधेली परिसरात राहत असल्याने या ठिकाणी विवाह आयोजित करण्यात आला होता. ठरल्याप्रमाणे हा विवाह काल (गुरुवारी) दुपारी नियोजित होता. या विवाहासाठी मुंबईवरून वऱ्हाडी मंडळ टूर ट्रॅव्हल्समधून आली होती. दुपारी साडेबाराचा विवाहाचा मुहूर्त असताना तीन वाजले तरी वऱ्हाडी मंडळी वरात काही पुढे नेण्यास तयार होत नव्हते. दारूच्या नशेत हे मंडळी नाचत होते. त्यामुळे विवाहाला उशीर झाल्याने वधूच्या नातेवाईक मंडळींकडून विनवण्याही केल्या जाऊ लागल्या. त्यानंतर कसेबसे नशेत टूल असलेले मुंबईते वऱ्हाडी विवाह मंडपात दाखल झाले आणि कसाबसा विवाह लागला.

Aurangabad marriage Drama
व्हिडिओ मागे टोमॅटोसारखे लाल गाल असलेल्या NCPच्या नेत्याचा हात; सदाभाऊ खोत यांचा आरोप

हाणामारी आणि पोलिसांची एन्ट्री

तणावात लागलेल्या विवाहानंतर सगळं काही ठिक होईल असं वाटलं. मात्र मुंबईवरुन आलेल्या वऱ्हाडी मंडळींनी जेवण्यावरून वाद उकरला. त्यानंतर वधूच्या मेव्हण्याने वराकडील मंडळींकडे ठरल्याप्रमाणे पुरोहिताला देण्यासाठी पूजेचे अर्धे पैसे देण्याची मागणी केली. तेव्हा चिडलेल्या वराच्या नातेवाईकांनी नवरीच्या मेहुण्याला जबर मारहाण केली. यावरून वधू आणि वर मंडळींतील वाद विकोपाला गेला आणि वर पक्षाकडून झालेल्या मारहाणीत वधू पक्षाकडील दोन महिलाही जखमी झाल्या. यात दोघांची डोकी फुटली. या वादात गावकऱ्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुणीही ऐकायला तयार नसल्याने गावकऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच चिकलठाणा पोलीस (Chikalthana Police) विवाह मंडपात दाखल झाले.

वधूनेच लग्न मोडलं

पोलिसांना पाहून यावेळी हा वाद मिटला असल्याचं वर पक्षाने सांगितलं. मात्र त्यानंतर वधूला घेऊन वऱ्हाड निघण्याच्या वेळी मात्र वराने थेट मुलगी पसंत नसल्याचं कारण देत तिला सोबत घेऊन जाण्यास नाकार दिला. यावेळी मात्र हादरलेल्या वधू पक्षाच्या नातेवाईकांनी मुंबईच्या या वऱ्हाडी मंडळींनी बेदम मारहाण करत ट्रॅव्हल्समधून आलेल्या या वाहनांच्या काचाही फोडल्या, ट्रॅव्हल्सच्या सीटची मोडतोड केली. वधू पक्षाचा आक्रमकपणा आणि नातेवाईकांच्या दबावाखाली वर वधूला घेऊन जाण्यास तयार झाला. मात्र यावेळी वधूनेही आपली भूमिका मांडली. "आपण अशा नवऱ्यासोबत नांदण्यास तयार नाही" असे सांगत खुद्द वधूनेच या लग्नाला विरोध केला. त्यामुळे मुंबईच्या या वराला आणि वऱ्हाडी मंडळींना पुन्हा चांगलेच फटके देऊन वधू मंडळीने आल्या पावली परत पाठवले. लग्न करुनही वधूला सोबत न घेता परत जाण्याची वेळ नवऱ्यावर आणि मुंबईच्या वऱ्हाड्यांवर आली. या प्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात या अजब घटनेची नोंद करण्यात आली आहे.

Aurangabad marriage Drama
Sadabhau Khot : तो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता होता; सदाभाऊ खोत यांचा गंभीर आरोप
अन् सगळ्यांनी सुटकेटचा निःश्वास सोडला

दरम्यान वरासह वऱ्हाडी मंडळी परत गेल्यानंतर झालेला हा विवाह मोडून वधू मंडळींकडून दुसऱ्या नवऱ्या मुलाचा शोध सुरू झाला. वधूच्या नातेवाईकांनी आपल्याच नात्यातील मुलाचा शोध घेतला. रात्री उशिरा वधूच्या आत्यामुलाला या लग्नासाठी विचारणा करण्यात आली आणि त्यानेही लगेच होकार दिला. यानंतर त्याच दिवशी (गुरुवारी) रात्री साडे नऊ वाजता या वधूचा दुसरा विवाह लावून देण्यात आला. त्यानंतर लग्नासाठी आलेल्या नातेकवाईकांनी सुटकेचा नि:श्वास टाकत वधू-वराला शुभ आशीर्वाद देत सुखी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. मात्र दिवसभराच्या या सगळ्या घटनाक्रमात फॅमिली ड्रामा, अॅक्शन, फ्री स्टाईल हाणामारी, पोलीस, ट्वीस्ट असं सगळं काही होतं. त्यामुळे एका चित्रपटाच्या पटकथेला साजेशी अशी ही घटना सध्या सगळीकडे चर्चेचा विषय बनली आहे.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com