Aurangabad News : उतावळे नवरे अन् गुडघ्याला बाशिंग; पण नवरीच नसल्याने झालेत वांदे

वधू-वर मेळाव्यात मुलाच्या तुलनेत मुलींची संख्या अर्ध्यावर असल्याने नवरी कुठून आणायची असा प्रश्न निर्माण होतोय.
Aurangabad Marriage News
Aurangabad Marriage NewsSaam Tv

Aurangabad Latest News : नवरी मिळेना नवऱ्याला अशी गत सध्या विवाहेच्छूक तरुणांची झालीय. कारण वधू-वर मेळाव्यात मुलाच्या तुलनेत मुलींची संख्या अर्ध्यावर असल्याने नवरी कुठून आणायची असा प्रश्न निर्माण होतोय.

कोरोनामुळे जशी अर्थव्यवस्था हळूहळू रुळावर येतेय, तशी रखडलेल्या लग्नाचीही गाडी रुळावर येतेय. मात्र, त्यात अडचण झाली ती नवरोबांची. कारण राज्यात जिथे जिथे वधू वर परिचय मेळावे सुरू आहेत तिथं विवाहेच्छूक मुलांची संख्या आणि मुलींच्या संख्येचा काही मेळ बसेना.

Aurangabad Marriage News
Accident News : शेगावला निघालेल्या भाविकांच्या कारला निंबाफाट्यावर अपघात, एक ठार, चार जखमी

जिथं 400 मुलं आपल्या लग्नासाठी मुली शोधण्यासाठी येतात तिथे केवळ 200 मुली लग्नासाठी परिचय मेळाव्यात येतायत. गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या विवाहेच्छुकांसाठी वधू-वर मेळावे सुरू झाले. चालू वर्षात शहरात पाच समाजांचे वधू-वर मेळावे घेतले. मात्र, त्यात वधूंच्या तुलनेत वरांचे प्रमाण तब्बल अडीच-तीन पटींनी अधिक असल्याने आम्ही लग्नाळू म्हणणाऱ्यांची वाढती संख्या अनेक कुटुंबांसाठी चिंतेचा विषय बनला आहे.

तरुणींच्या शिक्षणाचेव अपेक्षांचे वाढते प्रमाण यामुळे वरांची संख्या वाढत असल्याचे निरीक्षण वधू-वर मेळाव्यात दिसतंय. औरंगाबाद (Aurangabad) जिल्हा गुरव समाज मंडळ, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, राजपूत - परदेशी परिचय मेळावा. माळी आणि भावसार समाज यांनी आयोजित केलेल्या मेळाव्यातील उपस्थितीच्या आकड्यांनुसार यात १,०८७ वर, तर ४०० वधूंचा सहभाग होता.

Aurangabad Marriage News
Jayant Patil: सरकार गोंधळलेले, सर्वांना एकत्रित कसं ठेवायचे हा सरकारसमोर प्रश्न; जयंत पाटील

मुलींच्या आणि मुलींच्या कुटुंबीयांच्या अपेक्षा आता वाढत चालल्या आहेत. सरकारी नोकरी किंवा मोठ्या हुद्द्यावर असेल तर प्राधान्य दिला जातो. मात्र खाजगी कंपनी किंवा शेती करीत असेल तर स्थळ नाकारले. पण त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे मुलींची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्यामुळे वधू वर सूचक मंडळामध्ये सुद्धा नोंदणी अत्यल्प आहे.

त्यामुळे लग्नासाठी (Marraige) आता मुलगी कशी शोधायची असा प्रश्न नक्कीच पडला आहे. पण या पुढच्या काळात ही स्थिती त्यापेक्षाही अधिक असू शकते. त्याचा विचार समाजाने केला पाहिजे हे मात्र नक्की.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com