औरंगाबाद शहर हादरलं! जुन्या वादातून मिसारवाडीत युवकाचा चाकूने भोसकून खून

औरंगाबाद शहरातील मिसारवाडी भागामध्ये 25 वर्षीय युवकाचा ९ जणांनी चाकू भोकसून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली
औरंगाबाद शहर हादरलं! जुन्या वादातून मिसारवाडीत युवकाचा चाकूने भोसकून खून
औरंगाबाद शहर हादरलं! जुन्या वादातून मिसारवाडीत युवकाचा चाकूने भोसकून खूनSaamTV

अविनाश कानडजे

औरंगाबाद: औरंगाबाद शहरातील मिसारवाडी (Misarwadi) भागामध्ये 25 वर्षीय युवकाचा ९ जणांनी चाकू भोकसून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मागील वर्षांमध्ये 31 खून शहरांमध्ये (City) झाले होते. तर या खुनाने या वर्षाची सुरुवात झाली आहे. त्यामुळे शहरातील कायदा (Law) आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हसन साजिद पटेल असे मृताचे नाव आहे.

हे देखील पहा-

सिडको पोलिसांनी (police) दिलेल्या माहितीनुसार, मिसारवाडी येथे मध्यरात्री हसन पटेल याचा जुन्या वादातून ९ जणांनी खून केल्याचे उघडकीस झाले आहे. मृताचा भाऊ जावेद पटेल यांच्या तक्रारीवरून सिडको (CIDCO) पोलीस ठाण्यात ९ जणांविरुद्ध खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत हसन पटेल हा प्लॉट खरेदी- विक्रीचा व्यवसाय करत होता. संध्याकाळी ९ वाजेच्या सुमारास तो घराबाहेर पडला. रात्री अकरा ते साडेअकरा वाजेच्या दरम्यान, मिसारवाडीतील एका टपरीजवळ त्याच्यावर ९ जणांनी अचानक चाकूने हल्ला केला होता.

औरंगाबाद शहर हादरलं! जुन्या वादातून मिसारवाडीत युवकाचा चाकूने भोसकून खून
Pune: दिराने आंघोळीचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत केला बलात्कार

या प्रकरणातील मुख्य आरोपी तालेब चाऊस याने मृत हसनच्या पोटात चाकू खुपसला असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पोलीस उपायुक्त दीपक गीते उज्वला वनकर सहाय्यक आयुक्त शशीकांत पवार पोलीस निरीक्षक संभाजी पवार ड्युटी ऑफिसर उपनिरीक्षक कृष्णा घायाळ यांनी घटनास्थळाला भेट देऊन आरोपींचा शोध सुरू केला आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com