Aurangabad: विद्युत पारेषणच्या भोंगळ कारभारमुळे नागरिकांच्या जीवाला धोका

औरंगाबादमध्ये विद्युत पारेषणच्या भोंगळ कारभारमुळे नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.
Aurangabad: विद्युत पारेषणच्या भोंगळ कारभारमुळे नागरिकांच्या जीवाला धोका
AurangabadSaam Tv

अविनाश कानडजे

औरंगाबाद : औरंगाबाद मध्ये विद्युत पारेषणच्या भोंगळ कारभारमुळे नागरिकांच्या जिवाला धोका धोका निर्माण झाला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील बाजारसावंगी ते जैतखेडा रस्त्यावर विद्युत पारेषण वाहिनीच्या तारा खाली तुटुन लोंबकळल्याने या रस्त्यावरील वाहतूक आज सकाळी आठवाजेपासून ठप्प आहे.

Aurangabad
Aurangabad gambling News : औरंगाबाद बनलयं जुगाराचा अड्डा, पोलिसांकडून कारवाईचं सोंग?

बाजारसावंगी ते जैतखेडा या रस्त्यावरुन किमान 20-22 खेड्यातील नागरिक ये-जा करतात. तसेच, या रस्त्याजवळ नागरी वस्त्या आहे. या रस्त्यावरील शेखपूरवाडी फाट्या अगोदर विद्युत पारेषणची विद्युत वाहिनी गेली आहे.

Aurangabad
Aurangabad News : औरंगाबाद शहरात ठिकठिकाणी जुगार अड्डे ; तरुणांमध्ये वाढतोय जुगारचा नाद

या विद्युत वाहिनीवरील एका बाजुच्या दोन विद्युत तारा चिनीमातीच्या चिमण्यातुन तुटून जमिनी लगत लोंबकळल्या. तसेच, जवळ असलेल्या वस्तीवर वीजपुरवठा करणाऱ्या विद्युत खांबावर या तारा कोसळल्याने 4 विद्युत खांब विद्युत तारेसह भुईसपाट झाले. या विभागातील विद्युत पुरवठा खंडीत झाला.

विशेष म्हणजे या भागातील ही तिसरी घटना आहे. त्यामुळे या भागातील नागरिक भीतीच्या सावटाखाली वावरत आहे. याच भागातील विद्युत वाहिनी वेळोवेळी तुटत असल्यामुळे या भागातील रस्त्यावरील प्रवाशांच्या जीवाला धोका आहे. उशिरापर्यंत या विद्युत पारेषण विभागाचे कर्मचारी दुरूस्तीसाठी आले नसल्याचे या भागातील नागरिकांनी सांगितले आहे.

Edited By - Nupur Uppal

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com