क्या चोर बनेगा रे तू? चोराने मोबाईल चोरला खरा; मात्र स्वतःच्या चुकीने लागला पोलिसांच्या हाती!

मोबाईल चोराने चोरी करण्यापूर्वी भावाला केला फोन; नंबर वरून लागला चोरीचा छडा!
mobile theft
mobile theft SaamTvNews

- अविनाश कानडजे

औरंगाबाद : मोबाईल चोरट्याने मोबाईल दुकानामधून मोबाईल चोरी केली खरी; पण, त्याच्याच चुकीने तो पोलिसांच्या हाती लागला. नेहमी चोरीचे मोबाईल चालू केल्यावर त्याच्या लोकेशन नुसार चोराला पकडले जाते, परंतु इथं मात्र वेगळच घडलं. अंबरसिंग सुरज गुसिंगे असे पोलिसांनी पकडलेल्या मोबाईल चोरट्याचे नाव आहे. औरंगाबाद (Aurangabad) शहरामधील कॅनॉट परिसरातील एका मोबाईल दुकानात अंबरसिंग मोबाईल घ्यायला आला. त्याच्या मोबाईलची चार्जिंग संपल्याने, त्याने दुकानात मोबाईल (Mobile) चार्जिंगला लावला.

हे देखील पहा :

माझ्या भावाचा फोन आल्यावर तो जो सांगेल तोच मोबाईल मी खरेदी करेल असे चोराने (theif) दुकानदाराला सांगितले आणि मोबाईल चार्जिंगला लावला. परंतु, दुकानातील एका कर्मचाऱ्याने चार्जिंग संपल्यावर त्याच्या भावाला कॉल करता येणार नाही, म्हणून त्या नंबरचा स्क्रीन शॉट घेतला. थोड्यावेळाने त्याने भावाला कॉल करतो म्हणून त्याचा मोबाइल खिशात घालून, बॉक्स मधील दोन मोबाईल घेऊन दुकानाबाहेर उभ्या असलेल्या मोटारसायकलवर बसून पळ काढला. या घटनेबाबत दुकानदाराने सिडको पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

mobile theft
हौसेला मोल नाही; जावयाला आणायला शेतकऱ्याने पाठवले चक्क हेलिकॉप्टर!

पोलीस (Police) निरीक्षक संभाजी पवार यांनी तपास सुरू केला. दुकानातील कर्मचाऱ्याने आंबरसिंग याच्या मोबाइल मधील नंबरचा स्क्रीनशॉट घेतलेला असल्याचे पोलिसांना कळताच पोलिसांनी त्या नंबरवर फोन करून आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून मोबाईल चोर अंबरसिंग याला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून 30 हजार रुपये किमतीचे चोरलेले मोबाईल जप्त केले. त्याने याच पद्धतीने शहरात अजून काही मोबाईल चोरी केले का? याचा कसून तपास सिडको पोलिस करत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com