जेवणाच्या नावाखाली गायब होणाऱ्या कर्मचाऱ्यांना औरंगाबाद महापालिकेने भरला दम

विशेष म्हणजे दुपारच्या जेवणासाठी गायब होत असल्याने आता कार्यालयात येताना डबे घेऊन या, अन्यथा इस्कॉनची खिचडी पाठविली जाईल, असा इशारा या कर्मचाऱ्यांना देण्यात आला आहे.
जेवणाच्या नावाखाली गायब होणाऱ्या कर्मचाऱ्यांना औरंगाबाद महापालिकेने भरला दम
जेवणाच्या नावाखाली गायब होणाऱ्या औरंगाबाद महापालिकेने कर्मचाऱ्यांना भरला दम SaamTV

औरंगाबाद महापालिकेने जेवणासाठी अर्धा दिवस गायब राहणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना चांगलाच दम दिला आहे. ऑफिसला येताना एक तर डबा घेऊन या, नाहीतर इस्कॉनची खिचडी खा, असा आदेश दिल्यानं कर्मचारी चांगलेच हादरले आहेत. औरंगाबाद महानगरपालिकेच्या कामचुकार कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना मालमत्ता विभागाने चांगलाच दम दिला आहे. अनेकदा आदेश आणि सूचना देऊनही मालमत्ता वसुलीसाठी कामचुकारपणा करणाऱ्या आता विशेष लक्ष दिले जाणार आहे. विशेष म्हणजे दुपारच्या जेवणासाठी गायब होत असल्याने आता कार्यालयात येताना डबे घेऊन या, अन्यथा इस्कॉनची खिचडी पाठविली जाईल, असा इशारा या कर्मचाऱ्यांना देण्यात आला आहे.

जेवणाच्या नावाखाली गायब होणाऱ्या औरंगाबाद महापालिकेने कर्मचाऱ्यांना भरला दम
धक्कादायक! तलाठी कार्यालयातच महिलेला बोलावून अश्लील चाळे

सध्या औरंगाबाद महापालिकेकडून मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुली वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वसुली कर्मचाऱ्यांना ठरावीक मालमत्तांची यादी देण्यात आली आहे. पण हे कर्मचारी प्रत्यक्षात घरोघरी जाऊन वसुली करतात का? कार्यालयात वेळेवर येतात का? याची तपासणी कर मूल्य निर्धारक व संकलक अपर्णा थेटे यांनी सुरू केली आहे. दोन दिवसांच्या पाहणीत दोन प्रभागात तब्बल ५२ कर्मचारी गैरहजर आढळून आले. त्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या जात आहेत.

२०२१-२२ या वर्षात मालमत्ता कराचे ४६८ कोटी ५४ लाख तर पाणीपट्टीचे १०८ कोटी ५७ लाख रुपये एवढे वसुलीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. थकबाकीदार व्यावसायिक मालमत्तांना सील लावण्याची कारवाई सध्या सुरू आहे. मात्र, त्यासाठी कर्मचारी काम करीत असल्याचं दिसून आलं आहे. ४४ पैकी ३२ कर्मचारी गैरहजर होते. त्यांना चौकशी केली असता, कोणी फिल्डवर आहे तर कोणी जेवणासाठी आत्ताच घरी आलो आहे, अशी कारणे दिली. त्यात २८ पैकी २० कर्मचारी कार्यालयात नव्हते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना वॉर्ड अधिकारी विक्रम दराडे यांनी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत.

औरंगाबाद महानगरपालिकेच्या स्थापनेपासूनच कधीही मालमत्ता वसुली पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे नेहमीच महापालिकेची तिजोरी रिकामी असते. यापूर्वी अनेक आयुक्तांनी कडक आदेश देऊनही अधिकारी आणि कर्मचारी जुमानत नसल्याचे वारंवार दिसून आले. आता या नव्या आदेशाने महापालिकेची तिजोरी भरेल का काकी कर्मचारीच आपलं पोट भरत असतील हे पाहावे लागेल.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com