Video: औरंगाबादच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटला; वाचा कोण बनणार नवीन पालकमंत्री

महाराष्ट्राच्या सर्व ३६ जिल्ह्यांना याचा आठवड्यात पालकमंत्री मिळणार
chief minister Eknath Shinde Group
chief minister Eknath Shinde GroupSaam TV

औरंगाबाद - राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन तीन महिने पूर्ण झाले आहे. असे असले तरी जिल्ह्यांना अद्याप पालकमंत्री (Guardian Minister) नाहीत. यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वारंवार शाब्दिक चकमकी होत आहेत. असे असताना आता जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदांबाबत या आठवड्यात निर्णय होणार असल्याची माहिती समोर आली आहे.मंत्रिमंडळाच्या स्थापनेनंतर ही पालकमंत्री नसल्यामुळे जिल्हा नियोजन विभागाकडून कामे होत नाहीत. पालकमंत्री नसल्यामुळे अडचणी येत आहेत त्यामुळे अखेर आता याच आठवड्यात पालकमंत्री पद प्रत्येक जिल्ह्याला दिला जाणार आहे.

chief minister Eknath Shinde Group
Congress : कॉंग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस; राहुल गांधींच्या अध्यक्षपदाला चव्हाणांचा विरोध

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राच्या सर्व ३६ जिल्ह्यांना याचा आठवड्यात पालकमंत्री मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. पालकमंत्री पदांबाबत याच आठवड्यात निर्णय होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या औरंगाबादच्या (Aurangabad) पालकमंत्री पदाचा तिढा अखेर सुटला आहे. 

औरंगाबादच्या पालकमंत्री पदावरून घोड अडलं होत, मात्र हे पद आता संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) म्हणजेच शिंदे गटाकडे जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. कॅबिनेट मंत्र्यांना दोन-दोन जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात येणार आहे. तसेच मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर राज्यमंत्र्यांकडे देखील एक जिल्ह्याची जबाबदारी देण्यात येणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com