Aurangabad: औरंगाबादच्या रॅंचोची कमाल! महारोजगार मेळाव्यात तरुणाच्या हॅलिकॉप्टरची चर्चा

आपण अनेकदा सोशल मीडियावर काही तरी जुगाडी व्हिडिओ बघत असतो. अनेकदा त्या माध्यमातून काही तरी बनवण्याचा प्रयत्न देखील करत असतो.
Aurangabad News Rancho
Aurangabad News Rancho Saam Tv

औरंगाबाद: आपण अनेकदा सोशल मीडियावर (Social Media) काही तरी जुगाडी व्हिडिओ बघत असतो. अनेकदा त्या माध्यमातून काही तरी बनवण्याचा प्रयत्न देखील करत असतो. टाकाऊ गोष्टींपासून टिकाऊ गोष्टीची उपयोगी वस्तू बनवणे सोबतच भंगार वस्तुंपासूनही काहीतरी उपयोगी वस्तू बनवणे हे आपण बऱ्याच व्हिडिओतून बघूनच करतो. अशीच एक भन्नाट वस्तू एका पठ्ठ््याने बनवली आहे. हा पठ्ठ््या औरंगाबादचा (Aurangabad) आहे. अनेक अडचणींवर मात करत त्याने हॅलिकॉप्टर (Helicopter) बनवले आहे. ITIचे शिक्षण घेतलेल्या तरुणाने घरातच चक्क हॉलिकॉप्टर बनवले आहे. आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याची कारणे देत मनातल्या इच्छा अपूर्ण राहिल्याचे अनेकजण बोलतात. पण त्याला हा रॅंचो अपवाद आहे.

Aurangabad News Rancho
Jitendra Awhad : "पत्राचाळीच्या निर्णयाशी पवारांचा संबंध नाही", जितेंद्र आव्हाड | SAAM TV

घरातल्या घरात राहून अनेक टाकाऊ गोष्टींपासून त्याने हॅलिकॉप्टर बनवले आहे. या रॅंचोचे नाव सतिश मुंडे असे आहे. घरातील आर्थिक स्थिती हालाकीची असल्याने लहान वयातच तो एका कंपनीत कामाला होता. परंतू लॉकडाऊनमुळे याचेही काम हातातून गेले होते. बारावी पास झालेल्या औरंगाबाद मधील सतीशच्या हॅलिकॉप्टरवर साऱ्यांचाच नजरा खिळून आहेत. पैसा नव्हता पण जिद्द होती आणि आर्थिक स्थिती नसतानाही त्याने हे करुन दाखवल्याने त्याच्यावर सर्वच स्तरातून कौतूकाचा वर्षाव होत आहे.

Aurangabad News Rancho
मुंबईत DRI चा 'सोनेरी' डाव, ३३ कोटींचे सोन्याचे ३९४ बिस्किट जप्त, 'असा' झाला तस्करीचा पर्दाफाश

या वर्षीच सतीश बारावी पूर्ण करत ITI महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे. घरातील परिस्थिती हालाकीची असल्याने बारावीला कला शाखेतून शिक्षण झाल्याने इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला नाही. खुद्द या रॅंचोने आपले संपूर्ण शिक्षण सोडून जॉब करत होता. हे संपूर्ण हॅलिकॉप्टर युट्युबच्या माध्यमातून बनवले होते. बऱ्याच भंगार असलेल्या गोष्टींनी मिळून त्याने हे हॅलिकॉप्टर बनवले. पैशांमुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव असल्याने हॅलिकॉप्टरने आकाशात उंच भरारी घेतली नाही. पण तरीही औरंगाबादच्या महारोजगार मेळाव्यात हे हॅलिकॉप्टर सर्वांच्याच कुतूहलाचा मुद्दा होता

Aurangabad News Rancho
Mumbai : मुंबईत भीषण अपघात! घाटकोपरमध्ये ओला चालकाने ८ जणांना उडवलं

औरंगाबाद येथील राँचो सतीश मुंडेला हवेत उडणाऱ्या गोष्टींचे लहानपणापासूनच आकर्षण अधिक होते. त्याने लॉकडाऊन काळात स्क्रॅपमधील वस्तूंपासून रांजणगाव येथे हेलिकॉप्टर तयार केले. हॅलिकॉप्टरसाठी पैसे कमी पडत असल्याने काही काम बाकी आहेत. अजूनही त्याला काही पैशांची मदत लागणार असून एखाद्या वर्षात ते ही काम पूर्ण होईल, असा त्याचा ठाम विश्वास आहे.सतीशने तीन वर्षे काम करून एक माणूस बसेल एवढे मोठे हेलिकॉप्टर बनविले आहे. घरची आर्थिक परिस्थिती एवढी चांगली नाही. परंतु इच्छा असेल तिथे मार्ग नक्कीच मिळतो असे नेहमी म्हटले जाते, ते सतीशने करून दाखवले आहे. आता त्याच्या या हेलिकॉप्टरच्या स्वप्नाला सत्यात उतरण्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com