ठाकरेंच्या विराेधातील शक्ती प्रदर्शनसाठी सिल्लाेडला अब्दुल सत्तारांची जय्यत तयारी सुरु

सिल्लोडमध्ये येत्या रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विकास कामांचे भूमिपूजन, लोकार्पण सोहळा होणार आहे.
abdul Sattar
abdul SattarSaam Tv

औरंगाबाद - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परवानगी दिली तर आमदारकीचा राजीनामा देऊन निवडणूक लढवेन असं प्रत्युत्तर शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना देणाऱ्या अब्दुल सत्तारांनी आपली ताकद काय आहे. हे दाखवून देण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या सिल्लोड दौऱ्यावेळी मोठं शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी एकनाथ शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar)यांनी सुरू केली आहे.

सिल्लोडमध्ये येत्या रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विकास कामांचे भूमिपूजन, लोकार्पण सोहळा होणार आहे. त्यानंतर त्यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. आमदार अब्दुल सत्तार मित्र मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे. सिल्लोड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण व छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार लोकार्पण तसेच विविध विकास कामांचे भूमिपूजन, लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.

हे देखील पाहा -

या कार्यक्रमाच्या पूर्वतयारी संदर्भात आमदार अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड येथे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली. त्या बैठकीलाच मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. शिवसेनेतून 40 आमदार एकनाथ शिंदे गटासोबत गेल्यानंतर त्या सर्व आमदारांना राजीनामे देऊन निवडणूक लढवा मग जनता तुम्हाला धडा शिकवेल असं आव्हान उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी केले होते.

abdul Sattar
IVF उपचारानंतरही भोजपुरी अभिनेत्री संभावना सेठला मातृत्व नाहीच; पतीनं सांगितलं मनातलं दुःख

त्याला उत्तर देत अब्दुल सत्तार यांनी मी राजीनामा देऊन निवडणुकीसाठी तयार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आता मुख्यमंत्र्याच्या दौऱ्यावेळी अब्दुल सत्तार हे स्वतःची ताकद किती आहे, हे दाखवून देणार असं दिसतंय आणि त्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com