Aurangabad: बिस्किट घेण्यासाठी गेलेल्या पाच वर्षीय मुलीवर अत्‍याचार

बिस्किट घेण्यासाठी गेलेल्या पाच वर्षीय मुलीवर अत्‍याचार
Aurangabad News
Aurangabad NewsSaam tv

औरंगाबाद : किराणा दुकानात बिस्किट आणि पाव आणण्यासाठी गेलेल्या पाच वर्षीय मुलीवर किराणा दुकानदारानेच अत्‍याचार केला. सदर खळबळजनक घटना (Aurangabad) औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील पाचोड पोलीस (Police) ठाणे हद्दीतील एका गावात घडली आहे. (Aurangabad Crime News)

Aurangabad News
भगर खाल्ल्याने गावातील वीस जणांना विषबाधा

एका गावातील पाच वर्षीय चिमुकलीला आईने दुकानात बिस्‍कीट व पाव घेण्यासाठी पाठविले. मुलगी दुकानात गेली असता दुकानात कोणी नसल्‍याचे पाहून दुकानदाराने मुलीवर (Crime) अत्‍याचार केला. याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पाचोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आरोपीस पोलिसांनी केली अटक

लहान मुलीवर अत्‍याचार करणारा बळीराम असे नराधम आरोपीचे नाव आहे. या नराधमाला पोलिसांनी अटक केली असून त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com