
औरंगाबाद - एटीएसने (ATS) अटक केलेल्या पीएफआयच्या (PFI) पाचव्या संशयितला न्यायालयाने दोन ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे महाराष्ट्र अध्यक्षाला दहशतवाद विरोधी पथकाने अटक करून शुक्रवारी दुपारी ‘एटीएस’च्या विशेष न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने या पाचव्या आरोपीला २ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली. शेख नासेर शेख साबेर ऊर्फ नदवी असे अटकेतील संशयिताचे नाव आहे.
तो औरंगबाद शहरातील बायजीपुरामध्ये राहतो. नदवी हे पीएफआयच्या महाराष्ट्र प्रमुख आहे. त्यांच्यासह शहरातील शेख इरफान शेख सलीम ऊर्फ मौलाना इरफान मिल्ली, सय्यद फैजल सय्यद खलील, परवेज खान मजम्मील खान आणि जालन्यातील अब्दुल हादी अब्दुल रऊफ यांना ताब्यात घेतले होते.
नदवी व्यतिरिक्त अन्य आरोपींना काल सकाळी अटक केली होती. नदवीची मात्र एटीएसचे अधिकारी चौकशी करीत होते. अखेर त्यास अटक करून 'एटीएस'चे पोलीसानी न्यायालयात हजर केले. यावेळी सरकारी वकील विनोद कोटेचा यांनी आरोपींविरोधात देशविरोधी कट रचल्याचा आरोप देखील केला आहे. शिवाय त्यांना 'टेरर फंडिंग' मिळाले का याचा तपास करण्यासाठी बँक खात्याची माहिती घेणे त्याचा कोणासोबत संपर्क आला होता, का याविषयी तपास करायचा असल्याने पोलीस कोठडी देण्याची विनंती केली. न्यायालयाने त्यास २ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
Edited By - Shivani Tichkule
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.