औरंगाबाद हादरलं! भाऊबीजेच्या दिवशीच १७ वर्षीय मुलीवर बलात्कार, कन्नड तालुक्यातील घटना

राज्यात भाऊबीजेचा सण उत्साहात साजरा केला जात असताना, औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे
Aurangabad News
Aurangabad News Saam TV

नवनीत तापाडिया, साम टीव्ही

Aurangabad News : राज्यात भाऊबीजेचा सण उत्साहात साजरा केला जात असताना, औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका १७ वर्षीय अल्पवयीन मुकबधीर मुलीवर गावातीलच एका व्यक्तीने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड (Kannad) तालुक्यात घडली आहे.

Aurangabad News
Abdul Sattar: दारू पिता का? अतिवृष्टी पाहणी दौऱ्यात कृषीमंत्र्यांची जिल्हाधिकाऱ्यांना विचारणा, व्हिडिओ व्हायरल

याप्रकरणी पीडित मुलीच्या आई-वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी (Police) संशयित आरोपीला अटक केली आहे. मोरू रामू राठोड असे या नराधमाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, पीडित मुलीचे आई-वडील शेतात मोलमजुरी करतात. नेहमीप्रमाणे ते मोलमजूरीसाठी शेतात गेले होते.

यावेळी पीडित मुलगी घरात एकटीच होती. याचीच संधी साधून आरोपी मोरू याने पीडितेच्या घरात प्रवेश केला. घरात कुणीच नसल्याचा फायदा घेत त्याने पीडितेवर जबरदस्तीने अत्याचार केला. याची वाच्यता कुणाजवळ केल्यास जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली.

Aurangabad News
Andheri Election : अंधेरी पूर्व पोटनिवडणूक रद्द होणार? निवडणूक आयोगाने घेतली 'त्या' तक्रारीची दखल

या सर्व प्रकारानंतर पीडिता प्रचंड घाबरली. संध्याकाळी आई-वडील घरी आल्यानंतर तिने घडलेला प्रकार सांगण्याचा प्रयत्न केला. याबाबत आईने तिची विचारपूस केली असता, पीडितेने आपल्यासोबत घडलेला प्रकार आईला सांगितला. मुलीवर अत्याचार झाल्याचं लक्षात येताच, आईने पोलिसांत धाव घेतली.

पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून कन्नड पोलीस ठाण्यात आरोपी मोरू रामू राठोड याच्याविरोधात बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com