एका बॉयफ्रेंडसाठी दोन अल्पवयीन गर्लफ्रेंडमध्ये 'राडा', हे पाहून तरुण गेला पळून

एकाच मुलीवर प्रेम करणाऱ्या दोन तरुणांचे वाद तुम्ही पाहिले असतील.
Aurangabad News
Aurangabad NewsSaam Tv

औरंगाबाद: प्रेमात पडल्यावर कधी काय होईल सांगता येत नाही. एकाच मुलीवर प्रेम करणाऱ्या दोन तरुणांचे वाद तुम्ही पाहिले असतील. तर एकतर्फी प्रेमातूनही अनेक वाद होत असतात. आता अशीच एक घटना समोर आली आहे. आ घटनेत दोन अल्पवयीन मुलींनी एका मुलासाठी रस्त्यातच राडा केल्याचे समोर आले आहे. ही घटना कोणत्याही बाहेरच्या राज्यातील नाही. तर ही घटना औरंगाबादमधील (Aurangabad) पैठण येथील आहे.

Aurangabad News
अजब प्रेम कहाणी! गर्लफ्रेंड झाली नापास, प्रियकराने थेट शाळाच दिली पेटवून

एखाद्या मुलीच्या प्रेमापोटी किंवा एकतर्फी प्रेमातून दोन मुलांमध्ये वाद झाल्याच्या घटना आपण ऐकल्या असतील पाहिलेही असतील‌. मात्र, औरंगाबादच्या (Aurangabad) पैठणमध्ये एका प्रियकरासाठी दोन प्रेयसी रस्त्यावर भांडताना पाहायला मिळाल्या.

मिळालेली माहिती अशी, पैठण मधील बस स्थानकावर दोन अल्पवयीन तरुणींमध्ये प्रियकरासाठी जोरदार भांडण झाले. एका प्रेयसीचा प्रियकर दुसऱ्या मुलीसोबत फिरताना दिसल्याची माहिती मिळताच दुसरी गर्लफ्रेंड पैठणच्या बसस्थानकात पोहोचली आणि मग भांडणाला सुरुवात झाली.

Aurangabad News
दुर्देवी! हरियाणातील अंबाला येथे एकाच कुटुंबातील ६ जणांनी केली आत्महत्या

बसस्थानकावरच दोघी एका बॉयफ्रेंडसाठी भिडल्या दोघींमधील वाद हाणामारी पर्यंत पोहोचला. यामुळे बस स्थानकावर गर्दी जमा झाली. हा गोंधळ सुरू असतानाच दुसरीकडे प्रकरण अधिक बिघडत असल्याचे पाहून बॉयफ्रेंडने मात्र तिथून पळ काढला. दरम्यान, हे भांडण पाहणाऱ्या प्रवाशांना मात्र हाणामारीचे कारण काही समजत नव्हते.

यानंतर घटनेची माहिती पैठण पोलिसांना मिळाली. पैठण पोलीस बस स्थानकावर पोहोचले, त्यांनी गोंधळ करणाऱ्या दोन्ही मुलींना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. पोलिसांना (Police) मारहाणीचे कारण समजल्यावर पोलीसही चक्रावून गेले. एक प्रियकर आणि त्याच्या दोन प्रेयसी असून तो माझाच असल्याचा दावा करत होत्या. याच कारणावरून दोन्ही तरुणींमध्ये सार्वजनिक ठिकाणी मारामारी केल्याचे खरे कारण समोर आले. या दोन्ही तरुणी अल्पवयीन असून शहरातीलच एका हायस्कूलमध्ये शिक्षण घेत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com