Aurangabad | महादेवाच्या मंदिराकडे जाताना भाविकांवर काळाचा घाला; टेम्पो उलटला, एक जागीच ठार

औरंगाबादच्या (Aurangabad) वेरुळ घाटात भाविकांना घेऊन जाणाारा टेम्पो उलटून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात टेम्पोमधील एक जण जागीच ठार झाला आहे.
Aurangabad Accident news
Aurangabad Accident news saam tv

नवनीत तापडिया

Aurangabad accident news marathi : औरंगाबादच्या (Aurangabad) वेरुळ घाटात भाविकांना घेऊन जाणाारा टेम्पो उलटून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात टेम्पोमधील एक जण जागीच ठार झाला आहे. तर अन्य १३ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. रविवारी, दुपारी चार वाजता सदर अपघाताची घटना घडली आहे. या अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या अपघातात झालेल्या जखमींना प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Aurangabad Accident news
Latur: सांगा आमच्या हक्काचा वाटा कुठं हाय; आक्रोश मोर्चाद्वारे तृतीय पंथीयांचा प्रश्‍न

मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबादच्या वेरुळ घाटात भाविकांना घेऊन जाणाारा टेम्पो उलटून अपघात झाला आहे. सदर अपघात हा खुलताबाद वेरूळ रस्त्यावरील चांगोबा वळणावर झाला आहे. नांदगाव तालुक्यातील पिनाकेश्वर येथील मोठा महादेव मंदिराकडे भाविक जात होते. औरंगाबादमधील भाविक हे वेरूळ येथून पाणी घेऊन जाण्यासाठी गंगापूर तालुक्यातील सावखेडा येथील तरुण एका टेम्पोमधून वेरूळ येथे जात होते. या रस्त्यादरम्यान, हा भीषण अपघात झाला आहे.

रविवारी दुपारी ४ वाजता सदर अपघात झाला आहे. या अपघातात एक जण जागीच ठार झाला आहे. तर या अपघातात १३ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Aurangabad Accident news
गडचिरोली पोलीस दलातील 41 जणांना पोलीस शौर्य पदक

दरम्यान, खुलताबाद वेरूळ रस्त्यावरील चांगोबा वळणावर झालेल्या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात एक जण जागीच ठार झाला आहे. तर या अपघातात १३ जण जखमी झाले. पोलिसांनी घटनास्थळावरील जखमींना खुलताबाद ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पोलिसांनी पुढील उपचारासाठी जखमींना औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल केले. या अपघात एक जण ठार आणि १३ जण जखमी झाल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तर अपघातात एक जण ठार झाल्याने त्या मृत व्यक्तीच्या गावावर शोककळा पसरली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com