औरंगाबाद : कारमध्ये धारदार शस्त्रे घेऊन फिरणाऱ्यास अटक!

औरंगाबाद शहरात आपल्या कारमध्ये दोन धारदार चाकू घेऊन फिरणाऱ्याला गुन्हे शाखेने अटक केली आहे.
औरंगाबाद : कारमध्ये धारदार शस्त्रे घेऊन फिरणाऱ्यास अटक!
औरंगाबाद : कारमध्ये धारदार शस्त्रे घेऊन फिरणाऱ्यास अटक!SaamTv

-- अविनाश कानडजे

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात आपल्या कारमध्ये दोन धारदार चाकू घेऊन फिरणाऱ्याला गुन्हे शाखेने अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक कल्याण शेळके यांना माहिती मिळाली होती की, शहरातील उस्मानपुरा येथील श्री गुरू तेग बहादुर हायस्कुल चौकामध्ये एक इसम त्याच्या पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये धारदार घातक शस्त्रे (Weapons) घेऊन येणार आहे.

हे देखील पहा :

मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने त्या ठिकाणी सापळा लावला असता मिळालेल्या माहितीनुसार, एक कार तेथे आली. तेव्हा पथकाने कार (Car) थांबवून त्या कारची झडती घेतली तेव्हा कार मध्ये 300 रुपये किमतीची पावनेतेरा इंच लांबीची कुकरी तर 500 रुपयाची सोळा इंच लांबीची कुकरी मिळून आली.

औरंगाबाद : कारमध्ये धारदार शस्त्रे घेऊन फिरणाऱ्यास अटक!
संदीप क्षीरसागर यांनी पदासाठी रक्ताचे नाते तोडले - डॉ.भारतभूषण क्षीरसागर

त्यानंतर पोलिसांनी (police) कार चालकाला ताब्यात घेतले. तौफिक खान उबेद खान असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने धारदार शस्र आणि कार असा एकूण 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शहरात मागील काही दिवसांपासून छोट्या छोट्या कारणावरून चाकूने वार करून खून (Murder) करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे गुन्हे शाखेने केलेल्या या कारवाईने होणारी घटना टळली असल्याची शहरात चर्चा सुरू आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com