अल्पवयीन मुलीचे अश्लील फोटो पोस्ट करण्याची धमकी; पैशांची मागणी करणाऱ्याला अटक

इन्स्टाग्रामवर बनावट आयडी बनवून मुलीचे अश्लील फोटो पोस्ट करुन खंडणीची मागणी करणाऱ्या तरुणाला चांगलेच महागात पडले आहे.
अल्पवयीन मुलीचे अश्लील फोटो पोस्ट करण्याची धमकी; पैशांची मागणी करणाऱ्याला अटक
Aurangabad policeSaam Tv

अविनाश कानडजे

औरंगाबाद: इन्स्टाग्रामवर बनावट आय. डी. बनवून मुलीचे अश्लील फोटो पोस्ट करुन खंडणीची मागणी करणाऱ्या तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. उत्तर प्रदेश राज्यातील आरोपीला औरंगाबाद येथील सिटीचौक तपास पथकाने सोलापूर येथून ताब्यात घेतले आहे (Aurangabad police arrest one who threaten minor girl to post obscene photos on Instagram).

Aurangabad police
मुंबई पोलिसांची मोठी कारवाई! 16 कोटींचे ड्रग्ज जप्त, 3 तस्करांना अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन पीडितेची अरबाज नावाच्या व्यक्तीशी इन्स्टाग्राम (Instagram) वर ओळख झाली. यावेळी त्याने पीडितेकडून घरातील सर्वांचे मोबाईल क्रमांक मिळवले. पीडितेचे फोटो एडीट करुन ते अश्लील बनवून सोशल मिडीयावर वायरल करेन. तसेच, इन्स्टाग्रामवर बनावट खाते तयार करुन त्यावर पीडितेचा फोटो प्रोफाईलवर ठेवून अश्लील मजकूर टाकून पोस्ट करेन अशी धमकी त्याने पीडितेला दिली. या पोस्ट हटविण्यासाठी 2 लाख रुपयांची मागणीही त्याने पीडितेकडे केली.

Aurangabad police
दाऊद इब्राहिमचा पुतण्याला भारतात आणण्यास अपयश ; अमेरीकेत झाली होती अटक

मागणी पूर्ण न केल्यास पीडितेचे आणि कुटुंबातील लोकांचे फोटो टाकून बदनामी करण्याची धमकीही त्याने दिली. याप्रकरणी मानसिक त्रास दिल्याबाबत औरंगाबाद (Aurangabad) सिटी चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेतली असून दुय्यम पोलीस निरीक्षक अशोक भंडारे यांनी तपास करुन आरोपी अरबाज खानला सोलापूर जिल्ह्यातून अटक केली आहे.

Edited By - Nupur Uppal

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com