औरंगाबाद : गुटखा विक्री करणाऱ्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या, एक लाखाचा माल जप्त
Culprit Arrestedsaam Tv

औरंगाबाद : गुटखा विक्री करणाऱ्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या, एक लाखाचा माल जप्त

गुटखा विक्रिवर बंदी असतानाही काही जण गुटख्याचा व्यापार करत आहेत.

औरंगाबाद : शहरात खळबळ माजवणारी घटना उघडकीस आली आहे. गुटखा विक्रिवर बंदी असतानाही काही व्यापारी गुटख्याचा व्यवहार (Gutka Selling crime) करत असल्याचे समोर आले आहे. औरंगाबाद शहरातील रोशनगेट परिसरात एक तरुण व्यापारी गुटख्याचा माल विक्रिसाठी नेत होता. त्यावेळी औरंगाबैाद पोलीस (Aurangabad Police) आणि अन्न व औषध पुरवठा विभागाने संयुक्त कारवाई करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

Culprit Arrested
MLC ELECTION 2022 : 'निकालानंतर जो मला शिव्या देईल, मी त्याला मतदान केले आहे', हितेंद्र ठाकूरांचा टोला

मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद शहरात (Aurangabad) अवैधरित्या गुटखा विकणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. शेख इस्माइल शेख फारूक (culprit arrested) असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. आरोपीकडून तब्बल 1 लाख 6 हजार 240 रूपये किमतीचा गुटखा जप्त (Gutka seized) करण्यात आला आहे. आरोपी शेख विरोधात औरंगाबादच्या जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By - Naresh Shende

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com