Aurangabad Rain |कन्नड तालुक्यात मुसळधार पावासाने उडवली दैना; अनेक गावांचा संपर्क तुटला

औरंगाबाद (Auranagabad) जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातल्या पिशोर परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने नदी नाल्यांना पूर आला आहे. यामुळे या परिसरातील आठ ते नऊ गावांचा संपर्क तुटला आहे.
aurangabad rain
aurangabad rain saam tv

Aurangabad Rain News : औरंगाबाद (Auranagabad) जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातल्या पिशोर परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने नदी नाल्यांना पूर आला आहे. यामुळे या परिसरातील आठ ते नऊ गावांचा संपर्क तुटला आहे. यामुळे या गावातील गावकऱ्यांची दळणवळण व्यवस्था बंद पडली आहे. सोबतच पिशोर येथील अंजना पळशी प्रकल्प ओव्हर फ्लो झाला आहे.

aurangabad rain
'माझ्या मागं एकनाथ अन् देवेंद्र आहेत, मी काेणाला घाबरत नाही'

रात्रीच्या सुमारास कन्नड तालुक्यातील पिशोर भागात अंजना पळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस कोसळला. त्यामुळे परिसरातील अंजना, खडकी, इसम, कवडा नाला, कोळंबी, काटशेवरी इत्यादी नद्या व नाले दुथडी भरून वाहू लागले आहे. यामुळे कोळंबी, तांडा-भारंबा, भारंबा वाडी, माळेगाव ठोकळ, माळेगाव लोखंडी, जैतखेडा, साळेगाव, भिलदरी यासह अनेक गावांचा पिशोर या मुख्य बाजारपेठेशी संपर्क तुटला आहे. त्यामुळे शेतात गुरांना चारा पाणी करण्यासाठी व दुग्धव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना दूध काढण्यासाठी पूर ओसरण्याची वाट बघत थांबावे लागते.

थोडाफार पूर ओसरल्यानंतर या शेतकऱ्यांना नदीच्या दोन्ही काठांना दोर बांधून पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. रविवारी संध्याकाळी तसेच रात्री अंजना पळशी मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जवळपास 93 मिमी पाऊस झाल्याने नद्यांना अचानक पूर आले. यामुळे करंजखेडा, नागपूर या गावांचा साखरवेल, पिशोर या गावांशी संपर्क तुटला होता. अनेक पूल या पाण्यात खचले असून त्यावरून अवजड वाहने जाणे बंद करावे लागणार आहे.

aurangabad rain
मोठी बातमी! खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ, कोर्टाने ४ ऑक्टोंबरपर्यंत सुनावली कोठडी

अतिपावसाचा पिकांना फटका

पिशोर भागात झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहे. तर अनेक भागात शेतात पाणी तुंबले आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. आधीच पावसामुळे पिकं पिवळी पडत असतांना आता रविवारी झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे आता पिकं वाचण्याची शक्यता खूपच कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागणार आहे. तर रविवारी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com