मोठी बातमी! औरंगाबादचे संभाजीनगर नामकरणाचा वाद उच्च न्यायालयात; १ ऑगस्टला सुनावणी

औरंगाबादचे संभाजीनगर नामकरणाचा वाद आता उच्च न्यायालयात गेला आहे
Aurangabad Rename Sambhajinagar
Aurangabad Rename SambhajinagarSaam TV

मुंबई : औरंगाबादचे संभाजीनगर नामकरणाचा वाद आता उच्च न्यायालयात गेला आहे. औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करण्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. दाखल करण्यात आलेल्या या याचिकेवर १ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार असल्याचं कळतंय. (Aurangabad Name Changing Latest News)

Aurangabad Rename Sambhajinagar
Shivsainik : ठाकरेंच्या शिवसैनिकावर खूनी हल्ला; शिंदे गटाच्या सहा जणांवर गुन्हा दाखल, तिघे ताब्यात

औरंगाबादसह उस्मानाबाद शहराचं नामांतर करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने आपल्या शेवटच्या कॅबिनेट बैठकीत घेतला होता. त्यानंतर नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारने हा निर्णय रद्द केला होता. मात्र, 16 जुलै रोजी झालेल्या राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत शहराच्या नामांतराचा निर्णय पुन्हा घेण्यात आला.

त्यानुसार औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर, आणि उस्मानाबादचे नाव धाराशीव असं करण्यात आलं. याशिवाय नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देण्यात आलं. यासंदर्भातील माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती. (Aurangabad Sambhajinagar Latest News)

Aurangabad Rename Sambhajinagar
मंत्रिमंडळ विस्तार लांबल्याने शिंदे गटातील आमदारांमध्ये नाराजी? दररोज होतेय नेतृत्वाला विचारणा

एमआयएमचा नामांतरला विरोध

दरम्यान, दोन्ही शहराच्या नामांतराला एमआयएमने औरंगाबादच्या नामकरणाला तीव्र विरोध दर्शविला. नामांतरचा निर्णय झाल्यानंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलिल यांच्या नेतृत्वाखील एमआयएमने शहरात मोठा मोर्चा काढला होता व नामांतराला विरोध केला होता.

यामुळेच नामकरणाचा हा विषय आगामी काळातही तीव्र होण्याची शक्यता आहे. १९९७ मध्ये नामकरणाचा विषय सर्वोच्च न्यायालयात गेला होता. पण न्यायालयाने स्थगिती दिली नव्हती, असे सामान्य प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

एक हजार कोटी रुपयांचा खर्च

औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदल करणे म्हणजे एक बैठक घेऊन ठराव संमत करणे असे होत नाही. त्यासाठी एक हजार कोटी रुपयांचा खर्च आहे असा दावा औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला होता. औरंगाबादवर नामांतरचा मुद्दा लादला जातोय, दोन-तीन टक्के लोक असे आहेत जे याकडे जाती-धर्माच्या बाजूने पाहतात. काही लोक याला हिंदू-मुसलमानांचा मुद्दा बनवत आहेत. खरंतर असा मुद्दा होता कामा नये, एका शहराशी त्याची ओळख म्हणजेच इतिहास जोडलेला असतो, असं इम्तियाज जलील म्हणाले होते.

दरम्यान, औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करण्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. दाखल करण्यात आलेल्या या याचिकेवर १ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार असल्याचं कळतंय. त्यामुळे येणाऱ्या काळात नामांतराचा हा वाद कायमचा मिटणार की पुन्हा चिघळणार हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com