
औरंगाबाद : समृद्धी महामार्गामुळे वेगाने प्रवास पूर्ण होत आहे. मात्र महामार्ग सुरु झाल्यापासून अनेक अपघात झाले आहेत. या अपघातांची दखल आता वाहतूक विभागाने घेतली आहे. समृद्धी मार्गावरून जुन्या फोर व्हीलर कार वेगात पळवू नका, असा सल्ला औरंगाबादच्या आरटीओने दिला आहे.
औरंगाबाद आरटीओ अधिकाऱ्यांनी समृद्धी महामार्गाची पाहणी करून अपघात घडू नये यासाठी काय उपाययोजना करता येईल याबाबत काम सुरू केले आहे. समृद्धी महामार्गावर अगदी जुनाट फोर व्हीलरदेखील १२० किलोमीटर आणि त्यापेक्षा अधिक वेगाने चालवल्या जात आहेत. परंतु जुनी वाहने इतक्या वेगाने चालवल्याने अपघाताचा धोका वाढतो. त्यामुळे वेगावर नियंत्रण ठेवले पाहिजे. (Latest Marathi News)
त्याबरोबर टायर गरम होऊन फुटण्याची भीती असते. अशावेळी टायरमध्ये नायट्रोजन गॅस भरणे फायद्याचे ठरू शकते, असे निरीक्षण आरटीओ अधिकाऱ्यांनी नोंदवले आहे. समृद्धी महामार्गामुळे प्रवास गतीने होत आहे. परंतु, या रस्त्यावरील अपघातांच्या घटना चिंतेचा विषय ठरत आहे.
आरटीओ कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच समृद्धी महामार्गाची पाहणी केली. या महामार्गावर सुरक्षेच्या दृष्टीने सर्व आवश्यक त्या सुविधा उभारण्यात आलेल्या आहेत. वाहनचालकांच्या चुकीमुळे अपघातांना आमंत्रण मिळण्याचा धोका वाढतो. त्यामुळे महामार्गावर प्रवास करताना पुरेशी काळजी घेतली पाहिजे, असा सल्ला अधिकाऱ्यांनीवाहनचालकांना दिला आहे.
समृद्धी महामार्गावरील इंटर चेंजवर फलकाच्या माध्यमातून आरटीओ कार्यालयाकडून खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.