प्रवाशांना घेऊन जाणारी एसटी बस अचानक उलटली; औरंगाबादेतील थरारक घटना

बसमधून 40 ते 45 प्रवासी प्रवास करीत होते.
Aurangabad Bus Accident
Aurangabad Bus AccidentSaam TV

औरंगाबाद : राज्यात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जात असताना, औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला. किन्हळ फाट्याजवळ प्रवाशांना घेऊन जाणारी एसटी बस अचानक उलटली. या बसमधून (Bus Accident) 40 ते 45 प्रवासी प्रवास करीत होते. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. बसमधील प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या असून सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती आहे. (Aurangabad Bus Accident Latest News)

Aurangabad Bus Accident
मराठा आरक्षणाबाबत सत्तारांचं उपोषणकर्त्यांना लेखी आश्वासन; म्हणाले, मुख्यमंंत्री ४ दिवसांत...

सतत सुरू असलेल्या पावसामुळे ग्रामीण भागातील रस्त्याची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांचे सतत छोटे-मोठे अपघात होत असतात. गेल्या आठवड्यात देखील लासूर येथून निघालेल्या एका बसला खड्ड्यामुळे अपघात झाला होता. यावेळीही बस उलटली होती. पण, प्रवासी बचावले.

बसला अपघात कसा झाला?

मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद परिवहन मंडळाची अपघातग्रस्त एसटी बस शिरूरवरून औरंगाबादच्या दिशेने येत होती. दुपारी दोन वाजता रस्त्यावरील चिखलामुळं एसटी वाहकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळं बस पलटी झाल्याच सांगितलं जातं. (Aurangabad Shirur Bus Accident Latest News)

Aurangabad Bus Accident
विनायक मेटेंसोबत घातपात झाला असेल तर..., चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान

अचानक झालेल्या या अपघातामुळं बसमधील प्रवासी प्रचंड घाबरले होते. या अपघातात अनेक प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या. सुदैवानं सर्व प्रवासी सुखरूप आहेत. चालती बस पलटी झाल्यानं नागरिक धावत मदतीला गेले. त्यांनी प्रवाशांना बाहेर काढले.

काहींना मुका मार लागला. पण, सर्व प्रवासी सुखरूप आहेत. बसचा वेग हळू होता. शिवाय या रस्त्यावर वाहतूक नव्हती. त्यामुळं मोठा अनर्थ टळला.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com