Aurangabad News : हृदयद्रावक! औरंगाबादेत शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या

औरंगाबाद जिल्ह्याच्या सिल्लोड तालुक्यातील धावडा येथील हृदयद्रावक घटना
Aurangabad News
Aurangabad NewsSaam Tv

नवनीत तापडिया

Aurangabad Farmer News : औरंगाबाद जिल्ह्याच्या सिल्लोड तालुक्यात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. येथील एका शेतकरी दाम्पत्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना आहे.

ही घटना औरंगाबाद जिल्ह्याच्या सिल्लोड तालुक्यातील धावडा येथे घडली. सुरेखा दळवी आणि संतोष दळवी अशी आत्महत्या केलेल्या दाम्पत्याची नावे आहेत. शेतकरी दाम्पत्याच्या आत्महत्येच्या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Aurangabad News
Gurugram News : महिलेने मुलासह स्वत:ला 3 वर्ष घेतलं कोंडून, पतीलाही नव्हता घरात प्रवेश; कारण वाचून बसेल धक्का

पत्नीने सोमवारी (२० फेब्रुवारी) सकाळी विषारी किटक औषध प्राशन करून आत्महत्या केली. तर पतीने बुधवारी (२१ फेब्रुवारी रात्री झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. सततची नापिकता, विविध बँकेचे कर्ज,अशा आर्थिक विवंचनेतुन शेतकरी दामपत्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी सिल्लोड (Aurangabad) ग्रामीण पोलीस (police) ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

Aurangabad News
Supriya Sule : हा अजितदादा अन् माझ्यावरील अन्याय आहे; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?

महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

आर्थिक विवंचना आणि नैराश्यातून पत्नीने सोमवारी विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यानंतर कर्जबाजारीपणा आणि पत्नीच्या विरहातून बुधवारी पतीने देखील गळफास घेऊन आपले जीवन संपविल्याची माहिती आहे. या घटनेमुळे दोन मुले आणि दोन मुली पोरकी झाली आहेत.

महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, बुधवारी सकाळी संतोष दळवी यांचा मृतदेह स्वतः च्या शेतातील एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

त्यांना ग्रामस्थांनी तातडीने सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात आणले. तेथील डॉक्टरांनी तपासून मृत असल्याचे घोषित केले. बुधवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास संतोष यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंकार करण्यात आले. या मन हेलावून टाकणाऱ्या घटनेनं  परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com