कोट्यवधी रुपयांचा दगडांचा साठा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जप्त

औरंगाबाद शहरातील मध्यवर्ती भागात सापडलेल्या या मौल्यवान दगडामुळे प्रशासनही चकाकले आहे.
कोट्यवधी रुपयांचा दगडांचा साठा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जप्त
कोट्यवधी रुपयांचा दगडांचा साठा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जप्तमाधव सावरगावे

औरंगाबाद - आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कोट्यवधी रुपयांचे मूल्य असलेले दगड आणि सेमी प्रेसियस स्टोन्सच्या Stone साठ्यावर औरंगाबादच्या Aurangabad जिल्हाधिकारी कार्यालयाने कारवाई केली आहे. औरंगाबाद शहरातील मध्यवर्ती भागात सापडलेल्या या मौल्यवान दगडामुळे प्रशासनही चकाकले आहे.

औरंगाबाद शहरातील सेव्हन हिल परिसरातल्या आश्रफ मोतीवला यांच्या मालकीच्या जागेत असलेल्या या दगडांचा साठा औरंगाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयाने जप्त केला आहे. विविधरंगी असलेले हे दगड मौल्यवान असल्याची तक्रार जिल्हाधिकारी कार्यलयाकडे करण्यात आली आहे. हे दगड सेमी प्रेसियस स्टोन्स असल्याचाही सांगण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गौण खनिज विभागाने हा दगडांचा साठा जप्त केला आहे.

हे देखील पहा -

ही जागा ज्यांच्या मालकीची आहे आणि ज्यांच्या विरोधात तक्रार करण्यात आली आहे त्यांचे, नाव अश्रफ मोतीवाला आहे. आश्रफ मोतीवाला हे औरंगाबादमधील माजी नगरसेवक आणि माजी स्थायी समितीचे अध्यक्ष होते. आता त्यांना नोटीस पाठवून दगड उत्खनन करण्याचा परवाना आणि कुठून उत्खनन केली आहे याबाबत विचारणा करण्यात आली आहे.

कोट्यवधी रुपयांचा दगडांचा साठा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जप्त
बहिर्जी नाईक स्मारकाचे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाइन भूमिपूजन

हे दगड चीनसह काही देशात पाठवली जातात आणि या दगडांना मोठी किंमत असल्याचे सांगितले जात आहे. औरंगाबादसह राज्यातील काही जिल्ह्यात अशा प्रकारचे दगड आढळतात. ही दगड एकत्र करून पाच प्रकारात त्याचे वर्गीकरण केले जाते. त्यावरून त्याची किंमत ठरवली जाते. या दगडांचा वापर विविध सभेच्या वस्तू, अलंकार यासाठी वापरला जात असल्याची माहिती समोर आलीय. पण हे कुठं आणि कसं उत्खनन केलं जातं, याचा मात्र शोध लागत नाही. त्यामुळे मौल्यवान दगडांची तस्करी कशी केली जाते, यात कोणकोण सहभागी आहेत, हे तपासानंतर कळेल.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com