Aurangabad: दोन लग्नाळुंनी एकाच महिलेचा फोटो स्टेटसला ठेवला, वारी थेट पोलीस ठाण्यात

लग्नासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या दोन तरुणांना बायकोऐवजी पोलीस स्टेशनची हवा खावी लागलीये.
Aurangabad crime news
Aurangabad crime newssaam tv

औरंगाबाद : लग्नासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या दोन तरुणांना बायकोऐवजी पोलीस स्टेशनची हवा खावी लागलीये. भावी पत्नी म्हणून एकाच महिलेचे फोटो दोघा लग्नाळूंनी सोशल मीडियावर आपल्या स्टेटस ठेवल्याने ही भानगड झालीयं (Aurangabad two men keep photo of same woman on status as fiancé).

Aurangabad crime news
sangli: खराब रस्त्यामुळे लग्न समारंभ थांबले; ग्रामस्थांची खंत

आतापर्यंत आपण दोन बायका आणि फजिती ऐका, एका नवऱ्याची दुसरी बायको आणि दोन बायकाचा भांडण नवरा परेशान, अशी वाक्ये आपण ऐकली असतील. पण औरंगाबाद (Aurangabad) मध्ये जरा अजबच घडलंय. एका बायकोसाठी दोघा इच्छुक नवरदेवांची चांगलीच फजिती झालीये. फजिती तर झालीच, सोबत पोलीस स्टेशनची हवाही खावी लागलीये.

नेमकं काय घडलं?

औरंगाबादमध्ये एका ओळखीच्या विवाहित महिलेची छायाचित्रे आपली भावी पत्नी म्हणून दोन विवाहेच्छूक तरुणांनी स्वतः च्या व्हॉट्सअपवर आणि इन्स्टाग्रामवर स्टेटसवर ठेवली. मिसारवाडीतील 27 वर्षीय प्रवीण मदन तुपे आणि पडेगाव येथील 19 वर्षीय सुमित धीरज मोरे अशी दोघांची नावे आहेत. याची तक्रार महिलेने औरंगाबाद शहर सायबर पोलिसांना केल्यानंतर पोलिसांना त्यांना अटक केलीये.

Aurangabad crime news
जालन्यात अज्ञात मुलीशी लग्न लावून फसवणूक; वरपित्यास एक लाख तीस हजाराचा गंडा!

तक्रारदार विवाहितेचे पतीसोबत पटत नसल्याने ती तिच्या लहान बाळासह शहरात राहते. वाहनचालक आरोपी तुपेसोबत तिची गतवर्षी ओळख झाली होती. यातून पुढे काही दिवसांनी त्यांची मैत्री झाली. तुपेने तिला लग्नाची मागणी घातली. तिने त्याला स्पष्ट नकार दिला. मात्र, तो तिच्यावर एकतर्फी प्रेम करू लागला. एवढेच नव्हे तर मोरे यानेही तुपेप्रमाणेच तिची छायाचित्रे स्वतः च्या इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप स्टेटसवर अपलोड करून तिला भावी पत्नी असे संबोधित करण्यास सुरुवात केली. या प्रकारामुळे तिची समाजात बदनामी होऊ लागली. आपला विनयभंग आणि बदनामी झाल्याची तक्रार तिने 27 डिसेंबर रोजी सायबर पोलीस ठाण्यात नोंदविली होती.

आता दोघांनाही भावी पत्नी म्हणून सोशल मीडियावर स्टेटसवर फोटो ठेवणे चांगलंच महागात पडलंय. त्यामुळे आता त्यांच्याच स्टेटस धक्का लागलाय, कारण बायको तर सोडाच जेलची हवा खावी लागलीये.

Edited By - Nupur Uppal

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com