World Toilet Day 2022 : औरंगाबादेत ग्रामस्थांनी साजरा केला शौचालयाचा वाढदिवस; जाणून घ्या काय आहे कारण?

आज शौचालय दिनानिमित्त गावागावात घराघरात आता शौचालयासमोर केक कापला गेला.
World Toilet Day 2022
World Toilet Day 2022saam tv

World Toilet Day News : कधी तुम्ही शौचालयासमोर केक कापलेला पाहिला आहे का? कधी सेल्फी तरी काढलीय का? नाही ना. पण हे नवल वाटण्यासारखं औरंगाबाद जिल्ह्यात खरंखुरं घडलं आहे. कारण आज शौचालय दिनानिमित्त गावागावात घराघरात आता शौचालयासमोर केक कापला गेला. रांगोळी काढून सेल्फीही काढली गेली. या वाढदिवसाची चर्चा संपूर्ण राज्यभर सुरू झाली आहे. (Latest Marathi News)

World Toilet Day 2022
SambhajiRaje Chatrapati: राज्यपालांना महाराष्ट्राबाहेर पाठवा, शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्यानंतर संभाजीराजे छत्रपतींची संतप्त प्रतिक्रिया

घरातल्या शौचालयासमोर कापला जात असलेला हा केक पाहून एक तर तुम्हाला आश्चर्य वाटेल किंवा तुम्ही नाकही मुरडाल. पण हे नवल औरंगाबाद जिल्ह्यात घडतंय. कारण औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यात आज शौचालय दिनानिमित्त शौचालयाचा वाढदिवस गावागावात साजरा केला गेला.

माझे शौचालय ही भावना प्रत्येकांमध्ये रुजवण्यासाठी आज शनिवारी संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्यात चक्क शौचालयाचा वाढदिवस साजरा केला गेला आहे. काही ठिकाणी त्याची सुरुवातही झाली आहे.

World Toilet Day 2022
"शिवाजी महाराजांचा काळ जुना झाला..." राज्यपाल कोश्यारींच्या वक्तव्यामुळे वातावरण पुन्हा तापणार?

19 नोव्हेंबर हा जागतिक शौचालय (Toilet) दिन आहे. या निमित्ताने शौचालयाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाने आपल्या शौचालय समोर रांगोळी, दरवाजाला तोरण लावून साजरा करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेनी केले होते. केवळ वाढदिवस साजरा करायचा नाही तर शौचालय समवेत मोबाईलवर सेल्फी काढून जिल्हा परिषदेने दिलेल्या लिंक वर सेल्फी काढून पाठवण्यात आले. या आगळ्यावेगळ्या शौचालयाच्या वाढदिवसाची चर्चा राज्यभर होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com