ऑटो रिक्षाचे भाडे वाढणार; पहिल्या दीड किलोमीटरसाठी खिशात २३ रुपये ठेवा

पहिल्या दीड किलोमीटरसाठी २३ रुपये आणि त्यानंतर पुढील प्रत्येक किलोमीटरला १५ रुपये अशी दरवाढ सुचवली आहे.
Solapur News
Solapur NewsSaam Tv

सोलापूर - आता ऑटो रिक्षाने (Auto Rickshaw) प्रवास करण्यासाठी पहिल्या दीड किलोमीटर प्रवासासाठी अगोदर खिशात २३ रुपये ठेवा मगच बसा. कारण परिवहन रिक्षाचालकांच्या आंदोलनानंतर प्राधिकरणाने नुकतीच १८ रुपये पहिल्या दीड किलोमीटरसाठी दरवाढ जाहीर केली होती. ती मान्य न करता फेर प्रस्तावाची मागणी केली होती. त्यानुसार आता पहिल्या दीड किलोमीटरसाठी २३ रुपये आणि त्यानंतर पुढील प्रत्येक किलोमीटरला १५ रुपये अशी दरवाढ सुचवली आहे.

हे देखील पाहा -

गेल्या बारा वर्षांपासून महागाई वाढूनही रिक्षाचे प्रवासभाडे वाढले नसल्याने रिक्षाचालक कृती समितीचा उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे पाठपुरावा सुरू होता.आंदोलने, बंदही पुकारला होता. याची दखल घेऊन बैठक घेण्यात आली होती.त्यात रिक्षाचालकांची प्रतिकिलोमीटर ३० रुपयांची मागणी होती, मात्र प्रत्यक्षात बैठकीत पहिल्या दीड किलोमीटर प्रवासासाठी १८ रुपये दरवाढ सुचवली होती.

Solapur News
एनडीएच्या उमेदवार द्रोपदी मुर्मु यांचा विजय निश्चित; आशिष शेलार यांचा विश्वास

ती मान्य न करता रिक्षा संघटनांनी याचा निषेध करीत आरटीओ प्रशासनाकडे फेरप्रस्ताव सादर केला होता. यात ही दरवाढ मान्य करण्यात आली आहे. यामुळे रिक्षा चालकांमधून आनंद व्यक्त केला जात आहे. तर सामान्य सोलापूरकर या रिक्षा दरवाढीवर नाखुष असल्याचं चित्र दिसून येत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com