चंद्रपूर: गणेशोत्सवाच्या निमित्ताने अंधश्रद्धेवर जनजागृती!

श्रद्धा रुजवून अंधश्रद्धांना दूर सारणे ही गणेशोत्सवाची खरी ओळख चंद्रपूर जिल्ह्यातील एका गावाने साकार केली आहे.
चंद्रपूर: गणेशोत्सवाच्या निमित्ताने अंधश्रद्धेवर जनजागृती!
चंद्रपूर: गणेशोत्सवाच्या निमित्ताने अंधश्रद्धेवर जनजागृती!संजय तुमराम

संजय तुमराम

चंद्रपूर : श्रद्धा रुजवून अंधश्रद्धांना Superstitions दूर सारणे ही गणेशोत्सवाची Ganeshotsav खरी ओळख चंद्रपूर Chandrapur जिल्ह्यातील एका गावाने साकार केली आहे. गोंडपिंपरी तालुक्यातील धाबा या गावाने यासाठी पुढाकार घेतला आहे. गावाच्या सर्वच भागात जादूटोणाविरोधी कल्पक पोस्टर्स लावण्यात आले आहेत.

हे देखील पहा-

पोलीस विभागाने Police Department केलेली सूचना गावाने कृतीत आणत अंधश्रद्धा-जादूटोणाविरोधी विचारांना गावातून हद्दपार करण्याचे ठरविले आहे. गावातील गणेशोत्सव म्हणजे ग्रामस्थांचे एकत्रिकरण. याच काळात गावात अंधश्रद्धा-जादूटोणाविरोधी पोस्टर्स Posters लावून लोकांना याबाबत जागृत केले जात आहे.

चंद्रपूर: गणेशोत्सवाच्या निमित्ताने अंधश्रद्धेवर जनजागृती!
रुग्णानेच केला रुग्णाचा खून; सोलापुरमधील धक्कादायक प्रकार!

चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यात अंधश्रद्धा व जादूटोणा यामुळे मारहाणीच्या संवेदनशील झालेल्या चार मोठ्या घटना घडल्या आहेत. त्यामुळेच गणेशोत्सवाचे निमित्त साधत ग्रामीण भागात अंधश्रद्धा विरोधी जनजागृती महत्त्वाची ठरली आहे. हे काम पोलीस विभागाने एकट्याने न करता त्यातील लोकसहभाग महत्त्वाचा राहिला आहे. त्यामुळेच धाबा गावाने जादूटोना- तंत्र मंत्र- जारण-मारण याविरोधात पोस्टर जनजागृती करत या कामात आपले योगदान दिले आहे

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com